21 September 2020

News Flash

चिंचोटी, तुंगारेश्वर धबधबे पर्यटकफुल्ल!

एकदिवसीय सहलीसाठी तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा हा उत्तम पर्याय आहे.

  चिंचोटी धबधबा

पावसाळा आला की पर्यटकांचा ओघ धबधब्यांकडे वाढतो. धबधब्याखाली मनसोक्त भिजायचे आणि वर्षांसहल साजरी करायची याकडे पर्यटकांचा ओघ असतो. वसई तालुक्यातील तुंगारेश्वर आणि चिंचोटी धबधबे तर पर्यटकांचे खास आकर्षण! गेल्या आठवडय़ापासून वसईमध्ये मनसोक्त पाऊस पडत असल्याने पर्यटकांची या दोन्ही धबधब्यांवर गर्दी झाली आहे. धबधब्यांचा ‘चिंब’ आनंद घ्यायचा आणि येथील जंगलात सफर करायची, याचा अनुभव सध्या पर्यटक घेत आहेत.

एकदिवसीय सहलीसाठी तुंगारेश्वर व चिंचोटी धबधबा हा उत्तम पर्याय आहे. वर्षांसहलीबरोबरच जंगल सफरीचा अनुभव मिळत असल्याने अनेक हौशी पर्यटक, दुचाकीस्वार, छायाचित्रकार, प्रक्षी-प्राणीप्रेमी आणि निसर्गप्रेमी या ठिकाणी अवतरत आहेत. मुंबई महामार्गापासून आणि वसई रोड रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच असल्याने पर्यटकांची पसंती या भागाला असते. यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने गैरहजेरी लावल्याने येथील धबधबे उपलब्ध नव्हते. परंतु जूनच्या शेवटच्या आठवडय़ात उशिराने दाखल झालेल्या पावसाने मात्र पर्यटकांची ही हौस पूर्ण केली. रविवारपासून या भागात मोठी गर्दी होत आहे. येत्या काही महिन्यांत लाखो पर्यटक येथे दाखल होणार आहेत. सध्यातरी धबधब्यांचे आकर्षण असलेल्या तरुणाईची पावले येथील नदी, नाले ओलांडून सफारीचा आनंद घेत आहेत.

तुंगारेश्वरमध्ये नयनरम्य निसर्ग

पायथ्यापासून शिखरापर्यंत तब्ब्ल सात लहान-मोठे धबधबे पार करून तुंगारेश्वर येथे जाता येते. जसजसे उंच जाऊ , तसतसे धुक्याने भरलेली वाट पाहावयास मिळते. आजूबाजूला पसरलेली हिरवळ, उंचावरून दिसणारा निसर्गरम्य नजारा पाहण्यासाठी असंख्य पर्यटक येत असतात. तसेच या ठिकाणी अनेक प्रकारच्या पक्ष्यांची आणि प्राण्यांची पर्वणी येथे येणाऱ्या पर्यटकांना मिळते.

चिंचोटी येथील हिरवळ

या ठिकाणी पोहोचताना हिरव्यागार झाडाझुडपांच्या दाटीतून जावे लागते. या मार्गावर विलोभनीय धबधबे पाहावयास मिळतात. मुख्य धबधब्यापर्यंत पोहोचताना सुमारे तासभर चालावे लागते, तसेच वाटेवर वेगवेगळ्या प्रजातीची झाडे पाहावयास मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:01 am

Web Title: tungareshwar chinchoti waterfall
Next Stories
1 नियमबाहय़ गतिरोधकांचा वाहनचालकांना अडथळा
2 पाच मिनिटांत घर लुटणारा चोर अटकेत
3 मॉडेलिंगच्या आमिषाने तरुणींचे लैंगिक शोषण
Just Now!
X