25 October 2020

News Flash

वसईत करोना रुग्णाची संख्या १३, दिवसभरात चार नव्या रुग्णांची भर

चौथा तरुण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलातील कर्मचारी आहे.

संग्रहित छायाचित्र

विरार : वसई विरार शहरात शनिवारी ४ नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या १३ एवढी झाली आहे. यातील तीन तरुण हे अमेरिकेतून परतले होते तर चौथा तरुण मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलातील कर्मचारी आहे.

वसई पश्चिमेच्या गास गावातील ५ मित्र अमेरिकेहून परतले होते. यातील एक तरुण पुण्याला गेला होता. या सर्वाना अलगीकरणात ठेवण्यात आले होते. पुण्यात गेलेला तरुण पॉझिटिव्ह निघाल्यानंतर सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी संध्याकाळी स्पष्ट झाले. सध्या या रुग्णांना बोळींज येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते तीनही रुग्ण २८ ते ३५ च्या वयोगटातील आहेत.  तर प्रशासनाने राजोडी परिसर पूर्णतः बंद केला आहे.

तर चौथा रुग्ण हा महापालिका क्षेत्रात सापडला असून तो मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेल मधील कर्मचारी आहे. तो नालासोपारा पश्चिम येथे राहत  असून सध्या त्याला बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्याच्या कुटुंबियांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या तो कुणाच्या संपर्कात आला याचा तपास सुरु असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2020 7:38 pm

Web Title: vasai 13 coronavirus patient nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 कल्याण-डोंबिवलीत सापडले करोनाचे तीन नवे रुग्ण, सहा महिन्याच्या चिमुरड्याला लागण
2 पाच हजार टन चिकू सडतोय झाडाखाली; चिकू बागायतदारांना कोट्यवधींचा फटका
3 धान्याचा अवैद्य साठा करताना बोईसर मध्ये ट्रक पकडला
Just Now!
X