ठाणे : कोलशेत येथील वायु दलाच्या प्रवेशद्वारावर लष्कर अभियंता सेवेच्या (मिलिट्री इंजिनीअर सर्व्हिस) वाहन प्रवेशद्वाराला धडकून त्या प्रवेशद्वाराचा धक्का लागल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. रोशन झा (२४) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलशेत येथे वायु दलाचे तळ आहे. कोलशेत वरचा गाव भागात राहणारा रोशन झा मागील वर्षभरापासून वायुदलाच्या प्रवेशद्वारावर खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास रोशन झा हे प्रवेशद्वारावर कार्यरत असताना लष्कर अभियंता सेवेचे वाहन त्याठिकाणी आले. त्यावेळी वाहनाची येथील प्रवेशद्वाराला जोरदार धडक बसली. त्यामुळे प्रवेशद्वाराचा रोशन यांच्या डोक्याला धक्का लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

dawood bandu khan arrested marathi news
मुंबई: अखेर ४० वर्षांनंतर दाऊदला अटक
Live accident chiplun bike and auto dangerous accident captured in cctv two injured video
VIDEO: चिपळूणमधला थरारक लाईव्ह अपघात; रिक्षाचालकाचा यूटर्न अन् भयंकर शेवट, सांगा चूक नक्की कुणाची?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
dombivli marathi news, unconscious woman robbed marathi news
डोंबिवलीत रस्त्यावर चक्कर येऊन पडलेल्या बेशुध्द महिलेला लुटले
Sarafa, MNS, Avinash Jadhav,
मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात सराफाची तक्रार, पाच कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, गुन्हा दाखल
kalyan ac local latest marathi news
कल्याण, बदलापूर, टिटवाळा गारेगार लोकलमधील पोलीस, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या गर्दीने पासधारक प्रवासी त्रस्त

हेही वाचा : सिग्नल यंत्रणेत बिघाड; साडेचार तास रेल्वेसेवा ठप्प; आसनगाव-आटगाव स्थानकादरम्यानची घटना

त्यांना उपचारासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात नेण्यात आले. डाॅक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.