ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. असे असले तरी या काळात ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून शहरातील या भागास टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये मंगळवार सकाळी ९ पासून रात्रौ ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, ईटर्निटी या परिसरात पाणी पुरवठा सुरु राहिल.

तर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळवातील काही भाग पाणी पुरवठा सुरु राहिल. बुधवार २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) ठाणे शहराचाही पाणी पुरवठा बंद राहणार आहे.