दोन अल्पवयीन मुलींना शरीरविक्रय करण्यास भाग पाडणाऱ्या तुर्भे येथील कुंटणखान्याच्या मालकिणीला जिल्हा न्यायालयाने सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
कल्पना तमंग या तुर्भे येथील कुंटणखान्याच्या मालकिणीने कोलकत्ता येथून दोन १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलींना अपहरण करून आणले होते. त्यांच्याकडून ती जबरदस्तीने शरीरविक्रयाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून २६ नोव्हेंबर २०११ रोजी पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक पाठवून कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यावेळी तिथे दोन अल्पवयीन मुली आढळून आल्या.
मुलींचे जबाब, त्यांचा वैद्यकीय अहवाल, अन्य बारा जणांची साक्ष यामुळे आरोप सिद्ध झाला. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस.जे. काळे यांनी कल्पना तमंग हिला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.  संजय लोंढे यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.