नौपाडा येथील गावंड पथ परिसरातील शिवानंद सोसायटीत राहणाऱ्या एका विवाहितेने स्वत:च्या दोन मुलांच्या हाताची नस कापून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या तिघांना उपचारांकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शलाका शिखर परांजपे असे महिलेचे नाव असून तिला पाच वर्षीय मुलगी आणि दहा वर्षीय मुलगा आहे. गुरुवारी सायंकाळी राहत्या घरामध्ये तिने या दोन्ही मुलांच्या हाताची नस कापली आणि स्वत: गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर लगेचच तिचा पती घरी आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
तसेच त्याने लागलीच तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
First Published on March 27, 2015 12:46 pm