ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात मागील २८ दिवसांच्या कालावधीत तब्बल १६५३.५० मिमी इतका पाऊस झाल्याने जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १५६.८० टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद ही अंबरनाथ तालुक्यात करण्यात आली आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यात सरासरीच्या १२६.७० टक्के आणि उल्हासनगरमध्ये १२३.७० टक्के इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांची सुमारे ८७ टक्के लागवड पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.

ठाणे जिल्ह्यात जून महिन्यात जेमतेम ३२.३ मिमी इतक्याच पावसाची नोंद झाल्याने नागरिकांसह विविध पिकांची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. तसेच शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यात सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली होती. या कालावधीत जिल्ह्यातून वाहणाऱ्या उल्हासनदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठ्वड्यानंतर जिल्ह्यातील पावसाची जोर ओसरलेला दिसून येत आहे. मागील २८ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात १६५३.५० मिमी इतका पाऊस झाला असून सरासरीच्या तब्बल १०६ टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये १५६.८० टक्के इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद ही अंबरनाथ तालुक्यात करण्यात आली आहे. या खालोखाल शहापूर तालुक्यात सरासरीच्या १२६.७० टक्के आणि उल्हासनगरमध्ये १२३.७० टक्के इतका पाऊस झाला आहे. या खालोखाल भिवंडी १०६.६० टक्के, ठाणे तालुक्यात ९७ टक्के, कल्याण ९६ टक्के आणि मुरबाड तालुक्यात ९६.५० टक्के इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेला दमदार पाऊस हा शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक ठरला आहे.

खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड पूर्ण
ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला असून खरीपाची सुमारे ८७ टक्के लागवड झाली आहे. यामध्ये भात ४७ हजार १६९ हेक्टरवर (८५.८८ टक्के) लागवड झाली असून नागली १८२५.५० हेक्टर (७५.८५ टक्के), वरी ९९२.४० हेक्टर (९४ टक्के) तर तूर ४३२७ हेक्टर (१०४.७० टक्के) अशी लागवड झाली आहे. तसेच जिल्ह्यात खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. भात उत्पादक शेतकरी बांधवांचा पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून आता पर्यंत ३१ हजार ४४ शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामाध्यमातून १२ हजार ५४३ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे १३३ टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून ८०० क्विंटल भात बियाणे शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर देण्यात आले. अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी दि