ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात रविवारी १,३४५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३० हजार २८९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात ३८ जणांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील एकूण मृतांची संख्या ९८५ इतकी झाली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात रविवारी दिवसभरात १ हजार ३४५ नवे रुग्ण वाढले आहेत. त्यामध्ये कल्याण-डोंबिवली शहरातील ३६९, ठाणे शहरातील ३४१, नवी मुंबईतील १९७, भिवंडी शहरातील ५०, अंबरनाथ शहरातील ४५, उल्हासनगर शहरातील १०१, बदलापूर शहरातील ३५, मीरा-भाईंदर शहरातील ११६ आणि ठाणे ग्रामीणमधील ९१ रुग्णांचा समावेश आहे. तर, रविवारी जिल्ह्य़ात ३८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाण्यातील १४, कल्याणमधील ६, नवी मुंबईतील ४, मीरा-भाईंदरमधील ४, भिवंडीतील ३, ठाणे ग्रामीणमधील ३ तर अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण मृतांचा आकडा ९८५ वर पोहोचल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.