नालासोपारा येथे राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीला जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलगी नालासोपाऱ्यातील धानिवबाग येथे राहते.
शनिवारी दुपारी ती नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी परतत होती. त्या वेळी तिच्याच घराजवळ राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने तिला बळजबरीने आपल्या घरात ओढून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाची कुठे वाच्यता केली तर जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.
धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी दोन दिवस गप्प होती. सोमवारी तिने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी याबाबत वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात अपहरण, बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सासऱ्याकडून सुनेचा विनयभंग
वसई : नालासोपाऱ्याच्या आचोळे येथे एका इसमाने आपल्याच सुनेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
आचोळे रोड येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेने आपल्या सासऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. ६ ऑगस्ट रोजी घरात एकटी असताना ६५ वर्षीय सासऱ्याने विनयभंग केला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून विनयभंग, मारहाण, धमकी, शिवीगाळ आदी कलमांतर्गत गुन्हे दाखल करून तिच्या सासऱ्याला अटक केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Aug 2016 रोजी प्रकाशित
वसईत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार
२० वर्षीय तरुणीला जबरदस्तीने घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 17-08-2016 at 00:21 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 year old girl raped in vasai