ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झालेल्या सात नवीन बसगाडय़ा शहराच्या अंतर्गत मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत. सहा बसगाडय़ा धर्माचा पाडा ते मुलुंड मार्गावर तर उर्वरित एक बसगाडी ठाणे स्थानक ते हाजुरी या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही बससेवेचा फायदा प्रवाशांना होणार आहे.
ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात पुरेशा बसगाडय़ा नसल्यामुळे अनेक प्रवाशांना खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे परिवहन सेवेच्या सुविधेविषयी प्रवाशी फारसे समाधानी नसल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसगाडय़ांची संख्या वाढवण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून १९० नवीन बसगाडय़ा परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यापैकी ९२ बसगाडय़ा काही महिन्यांपूर्वीच दाखल झाल्या असून त्यापाठोपाठ आता सात नवीन गाडय़ा दाखल झाल्या आहेत.
धर्माचा पाडा ते मुलुंड : ३६ फेऱ्या
* मार्ग : धर्माचा पाडा, ब्रह्मांड, आझादनगर, सेंट झेवियर्स स्कूल, आझादनगर नाका, मुल्लाबाग, मानपाडा, धर्मवीर सोसायटी, खेवरा सर्कल, महाराष्ट्रनगर, इडनवुड कॉर्नर, वसंत विहार, आम्रपाली आर्केड, बेथनी हॉस्पिटल, लक्ष्मी नारायण सोसायटी, देवदयानगर, शास्त्रीनगर, वर्तकनगर, कोरस कंपनी, यशोधननगर, सावरकर नगर, कामगार रुग्णालय, अंबिका नगर, रोड नं. १६, अॅटोमॅटीक, मुलूंड चेकनाका, संतोषी माता मंदिर, कामगार रुग्णालय मार्गे मुलुंड.
* वेळापत्रक : (धर्माचा पाडा ते मुलुंड स्थानक) ६.३५, ६.५५, ७.१५, ७.३५, ७.५५, ८.१०, ८.४०, ९.००, ९.२५, ९.४५, १०.०५, १०.२५, ११.२५, ११.४५, १२.०५, १२.२५, १२.४५, १३.०५, १४.३५, १४.५५, १५.१५, १५.३५, १५.५०, १६.१५, १६.४५, १७.०५, १७.२५, १७.४५, १८.०५, १८.२५, १९.२५, १९.४५, २०.०५, २०.२५, २०.४५, २१.०५.
* (मुलुंड स्थानक ते धर्माचा पाडा) ७.३०, ७.५५, ८.१५, ८.४०, ८.५५, ९.१५, ९.४५, १०.०५, १०.३०, १०.५०, ११.०५, ११.३५, १२.३०, १२.५५, १३.१०, १३.३०, १३.५०, १४.१०, १५.३५, १५.५५, १६.१५, १६.४०, १६.५५, १७.१५, १७.४५, १८.०५, १८.३०, १८.५०, १९.५, १९.२५, २०.३०, २०.५५, २१.१०, २१.३०, २१.५०, २२.०५
ठाणे स्थानक ते हाजुरी
* फेऱ्या : २०
* मार्ग : तृणपुष्प सोसायटी, संतोषी माता चौक, जीवन सहकार सोसायटी, ग्रीन रोड, एलआईसी, रामकृष्णनगर सोसायटी, तीन हात नाका, मल्हार सिनेमा, ठाणे स्थानक.
* वेळापत्रक : (हाजुरी ते ठाणे स्थानक) ६.३०, ७.०५, ७.४०, ८.१५, ८.५०, ९.२५, १०.३०, ११.१०, ११.५०, १२.२५, १५.१५, १५.५०, १६.२५, १७.००, १८.०५, १८.४०, १९.१५, १९.५०, २०.३०, २१.१०
* (ठाणे स्थानक ते हाजुरी) ६.१५, ६.५०, ७२५, ८.००, ८.३५, ९.१०, ९.४५, १०.५०, ११.३०, १२.१०, १५.३५, १६.१०, १६.४५, १७.२०, १८.२५, १९.००, १९.३५, २०.१०, २०.५०