९० फीट मार्ग, डोंबिवली (पू.)

डोंबिवलीतील ‘९० फीट मार्ग’ हा मुंबईमधील मरिन ड्राइव्हची आठवण करून देत असला तरी इथे असलेल्या घाणीच्या साम्राज्याने या सौंदर्याला गालबोट लागले आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पदपथावर जमा झालेला कचरा, बाजूला असलेल्या नाल्याची दुर्गंधी, रस्त्यावरील कुत्र्यांमुळे ठिकठिकाणी झालेली घाण असे चित्र असल्याने सकाळच्या प्रहरी फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये नाराजी आहे.

inquiry committee set up to investigate rto scam
परिवहन विभागातील घोटाळ्याच्या तपासासाठी चौकशी समिती स्थापन
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

प्रभातफेरीचे ठिकाण म्हटल्यावर मोकळी हवा, हिरवळ, शांतता असे साधारण चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र डोंबिवलीतील बहुचर्चित ‘९० फीट मार्गा’वर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांना मात्र याच्या विपरीत दर्शन घडते. सकाळी प्रदूषणविरहित मोकळ्या हवेत फिरावे, थोडा हलका व्यायाम करावा, जमल्यास थोडी ध्यानधारणा, योगसाधना करावी या उद्देशाने लोक फिरायला येतात. कारण शहरात बोकाळलेल्या काँक्रीटच्या जंगलात अशा जागा दुर्मीळ असतात. डोंबिवली शहराबाहेर अशी काही ठिकाणे आहेत. ‘९० फीट रोड’ त्यापैकी एक. तो मुंबईतील मरिन ड्राइव्हची प्रतिकृती आहे. एमआयडीसीपासून सुरूहोणारा हा मार्ग थेट म्हसोबा चौक आणि पुढे कल्याणला जोडतो. प्रशस्त रस्ता आणि दुभाजकामध्ये लावण्यात आलेल्या झाडांनी या मार्गाची शोभा वाढवली आहे. या परिसरातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या रस्त्यावर फिरायला येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्यही वाढले आहे.

सकाळी साधारण ५.३० वाजल्यापासून या मार्गावर प्रभातफेरीसाठी माणसे येतात. परिसरालगतच्या सदनिकांमधील रहिवासी समूहासमूहाने येतात. एमआयडीसीपासून येथे काही लोक म्हसोबा चौकपर्यंत तर काही कल्याण मार्गाच्या टोकापर्यंत फेऱ्या मारतात. मार्गाच्या दोन्ही बाजूकडील पदपथावरून लोक फेऱ्या मारतात. म्हसोबा चौकाकडून कल्याण मार्गाकडे जाताना डाव्या बाजूला नाला आहे. पहाटे ताज्या हवेचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र या नाल्याच्या दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रशस्त रस्ता असल्याने पहाटेच्या वेळी अनेक जण येथे गाडय़ा शिकण्यासाठी येतात. बाजूलाच ठाकुर्ली रेल्वे स्थानक असल्याने पहाटेपासूनच येथे गाडय़ांचे आवाज येतात. मार्गाच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर कचरा, घाण पडलेली असते.

त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरलेली असते. मात्र अन्य कोणताही पर्याय नसल्याने नागरिकांना नाइलाजाने इथे फिरायला यावे लागते. पदपथापासून काही अंतरावर खुल्या व्यायामशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. बसण्यासाठी काही बाकांची व्यवस्था आहे. याशिवाय अन्य कोणत्याही सुविधा इथे नाहीत. आम्हाला सुविधा नको, फक्त घाण दूर करून स्वच्छता करावी, अशी इथे फिरायला येणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.

घराजवळच इतका प्रशस्त रस्ता असल्याने मी दररोज सकाळी इथे चालायला येतो. आमच्या इमारतीतील अनेक लोक येथे प्रभातफेरीसाठी येतात. प्रशस्त रस्त्यामुळे येथील वातावरण मोकळे वाटते. फक्त येथील साफ-सफाईचा प्रश्न सुटला तर बरे होईल.

-किरण पाटील

पदपथावर बनविण्यात आलेल्या खुल्या जिममुळे व्यायाम करणे सोयीस्कर झाले आहे. प्रभातफेरीनंतर आम्ही अनेक जण येथे व्यायाम करण्यासाठी थांबतो, परंतु बाजूलाच असलेल्या नाल्याच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. पदपथांवरही कचरा साठलेला असतो.

– सचिन अहिरे

आमच्या परिसरात प्रभातफेरीसाठी हा मार्ग वगळता अन्य कोणतीही प्रशस्त जागा नाही. आजूबाजूला असलेल्या सर्वच इमारतींमधील रहिवासी येथे सकाळी प्रभातफेरीसाठी येतात. त्यामुळे पालिकेने तातडीने येथील स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.

-आशीष मराठे