डोंबिवली- शासन आदेशानुसार गुटखा सदृश्य प्रतिबंधित असलेल्या सर्व घातक पान मसाला वस्तुंच्या विक्रीवर बंदी आहे. अन्न आणि प्रशासन विभाग अशा वस्तूंची विक्री होणार नाही याची काळजी घेतो. असे असताना डोंबिवली पश्चिमेतील एका पान टपरी चालक खाण्यासाठी अयोग्य असलेला प्रतिबंधित विमल पान मसाला वस्तू टपरीवर विक्री करताना आढळून आला. विष्णुनगर पोलिसांनी या विक्रेत्या विरुध्द फौजदारी कारवाई केली आहे.

या टपरी चालकाक़डून विमल पान मसाल्याच्या सतराशे रुपये किमतीच्या पुड्या पोलिसांनी जप्त केल्या.
सुधाकर लकप्पा शेट्टी (६६, श्री अंबिका पान शाॅप व जनरल स्टोअर्स) असे टपरी मालकाचे नाव आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस श्रीराम मिसाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेण्यात आला.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आरोग्यास घातक होईल अशा पान मसाला वस्तू विक्री, वाहतूक आणि खाण्यास प्रतिबंध आहे. या उत्पादनांवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. असे असताना काही विक्रेते बाहेरील राज्यातून घातक पान मसाल्याच्या वस्तू गुप्त मार्गाने आणून त्या चोरून आपल्या टपरीत विकत आहेत. अशाप्रकारे विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत श्री अंबिका शाॅप दुकानाचा मालक सुधाकर शेट्टी बंदी असलेला विमल पान मसाला ग्राहकांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खातरजमा केली. त्यांना घातक पान मसाला शेट्टी विकत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याच्या टपरीवर छापा टाकून सतराशे रुपयांच्या विमल पान मसाल्याच्या पुड्या जप्त केल्या.
अन्न आणि सुरक्षा मानके कायद्यानुसार सुधाकर शेट्टी याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.