करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना ठाणे महापालिका हद्दीत सेरो सर्वेक्षणाचा अहवाल दिलासादायक  आहे. महापालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणात ९०.४६ टक्के नागरिकांमध्ये करोना प्रतिपिंडे आढळली आहेत, अशी माहिती आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शुक्रवारी दिली. लस घेतल्यानंतरही सात टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आलेली नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात १२ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत महापालिका, सेरो एटीई चंद्रा फाऊंडेशन आणि आयडीएफसी संस्थेच्या माध्यमातून सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणामध्ये १,५७१ नागरिकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी १,४२४ म्हणजेच ९०.६४ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. ठाणे महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील नागरिकांमध्ये प्रर्तिंपडाचे प्रमाण कमी म्हणजेच ७९.२१ टक्के आहे. तर उथळसर येथील ९६.०७ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली आहेत. मुंब्रा शहरातही ९२.१८ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे तयार झाल्याचे आढळून आले.

Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
Botswana threatening Germany to send elephants
२० हजार हत्तींचं जर्मन कनेक्शन काय? जाणून घ्या
wealthy MP Bhandara
मागासलेल्या भंडाऱ्याचे श्रीमंत खासदार, मेंढे दाम्पत्याकडे १०१ कोटींहून अधिक संपत्ती…

अहवालात काय?

* इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये ९३.३२ टक्के तर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये ८८.१२ टक्के प्रतिपिंडे तयार झाली आहेत.

* पुरुषांमध्ये ८९.६१ टक्के तर स्त्रियांमध्ये ९१.९१ टक्के प्रतिपिंडे आढळून आली आहेत.

* लसीकरणासाठी पात्र नसलेल्या ६ ते १७ वयोगटात ८३.४३ टक्के प्रतिपिंडे आढळून आली.

* ३१ ते ४५ वयोगटातील ९४.०३ टक्के नागरिकांमध्ये सर्वाधिक प्रतिपिंडे आढळून आली.

घोडबंदरमधील नागरिकांमध्ये प्रमाण कमी…

महापालिकेने घोडबंदर भागातील १७८ नागरिकांचे रक्ताचे नमुने गोळा केले. यापैकी १४१ जणांमध्ये म्हणजेच ७९.२१ टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे आढळून आली. प्रर्तिंपडांचे प्रमाण जास्त असले तरी शहरातील इतर भागाच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. या भागात ठाणे शहरातील इतर भागाच्या तुलनेत दाटीवाटीची वस्ती कमी आहे. करोना कालावधीत येथील बऱ्यापैकी नागरिक घरातूनच काम करत आहेत. इतर नागरिकांमध्ये सोबत त्यांचा संपर्क कमी आला, त्यामुळे इतर भागातील नागरिकांच्या तुलनेत येथील नागरिकांमध्ये प्रतिपिंडे तयार होण्याचे प्रमाण कमी असू शकते, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.