मुख्य वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियेसाठी रजेवर; पर्यायी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल

unique solution to traffic congestion in Pune A two-wheeled ambulance will run on the road
पुण्यातील वाहतूक कोंडीवर अनोखा उपाय! रस्त्यावर धावणार दुचाकी रुग्णवाहिका
condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
North East Mumbai Lok Sabha Constituency Citizens Health Issue
आमचा प्रश्न – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न टांगणीला

शहर म्हणून नावारूपास येत असलेल्या बदलापुरात आधीच बिकट परिस्थितीत असलेले पालिकेचे रुग्णालय गेल्या आठवडाभरापासून डॉक्टरांअभावी बंद पडले असून बाह्य़रुग्ण सेवा बंद असल्याने शहरातील रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून शहराबाहेर असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात जावे लागत असल्याने रुग्ण संताप व्यक्त करीत आहेत.

कुळगाव-बदलापूर पालिकेचे मुख्यालय दुबे रुग्णालयात आहे. त्या रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी गेल्या आठवडाभरापासून आपल्या उपचारासाठी रजेवर आहेत. त्यांची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती रुग्णालयातील कर्मचारी देतात. मात्र यामुळे २० एप्रिलपासून रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग बंद असून परिणामी येथे दररोज येणाऱ्या रुग्णांचे उपचार बंद आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शहरातील खासगी उपचार महाग असल्याने अनेक रुग्ण पालिका रुग्णालयात उपचार घेत असतात. येथे अवघ्या दहा रुपयांत उपचार केले जातात. त्यामुळे दिवसाला जवळपास ३०० रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत असतात. मात्र गेल्या आठवडाभरापासून येथील बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने अनेक रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, तसेच सध्या बंद असलेल्या पालिका रुग्णालयातील कर्मचारीवर्ग रुग्णांना शहराबाहेर असलेल्या ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत. ग्रामीण रुग्णालयाचा पर्याय असला तरी तोही महागडा ठरत असल्याने रुग्णांची आर्थिक कोंडी झाली आहे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी

गेल्या काही वर्षांपासून येथे अतिरिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक व्हावी, अशी मागणी नागरिक आणि पालिकाही शासनाकडे करत आहे. अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे एकटे वैद्यकीय अधिकारी रुग्णालयाचा गाडा हाकत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही त्याचा मोठा भार पडतो. मात्र ग्रामीण रुग्णालयाचे कारण दाखवीत शासन पालिका रुग्णालयाच्या विकासाकडे दुर्लक्ष करत आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील नगरपालिका क्षेत्रात ७५-२५ या तत्त्वावर शहरी भागातील नागरिकांना स्वस्त उपचारासाठी बदलापूर नगरपालिकेत दोन पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, दोन मुख्य परिचारिका, १८ साहाय्यक परिचारिका, १ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, १ औषध निर्माता, दोन डेटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटट व दोन शिपाई अशी २९ पदे मंजूर केली आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेली ही पदे भरण्यात यावीत, असा ठराव कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने मंजूर करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे.

पर्यायी डॉक्टर नसल्याने बाह्य़रुग्ण विभाग बंद आहे, मात्र लसीकरण आणि इतर गोष्टी रुग्णालयात सुरू आहेत. पर्यायी डॉक्टरांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

देवीदास पवार, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापूर नगरपालिका.