घोसाळे तलाव, कॅसल मिल, ठाणे (प.)

ठाणे शहरात असलेल्या तलावांमुळे या शहराला तलावांचे शहर म्हणून संबोधले जाते. या तलावाकाठची शांतता अनुभवण्यासाठी ठाणेकर अशा तलावाकाठी सकाळी आणि सायंकाळच्या वेळी गर्दी करतात. घोसाळे तलाव परिसर अशा ठिकाणांपैकी एक आहे. प्रभातफेरी आणि सायंकाळच्या फेरफटका मारण्यासाठी हे हक्काचे ठिकाण बनू लागले आहे.

Fraud, Fraud with youth,
प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणाची दीड लाखांची फसवणूक
parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

तलावाकाठी सकाळचा व्यायाम, पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये प्रभात फेरी, प्रसन्न वातावरण, तलावाकाठी निजलेल्या बदकांना पाहत दिवसाची सुरुवात हा अनुभव मिळतो ठाणे महानगरपालिकेच्या घोसाळे तलावाजवळ. मुख्य शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या कॅसल मिल नाक्याजवळील घोसाळे तलावाकाठी फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी या परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात गर्दी करीत असतात. वृंदावन सोसायटी, श्रीरंग सोसायटी, विकास कॉम्प्लेक्स या जवळच्या गृहसंकुलातील रहिवाशांचे प्रभातफेरी आणि सायंकाळची फेरफटका मारण्यासाठी घोसाळे तलाव हे हक्काचे ठिकाण आहे.

तलावाच्या प्रवेशद्वारासमोरच घोडबंदरकडे जाणारा रस्ता असल्याने वाहनांची वर्दळ कायम असते. मात्र स्वच्छ तलाव परिसर आणि तलावाकाठी अनुभवायला मिळणारी शांतता यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक या तलावाच्या काठी गर्दी करतात. सकाळी ६ वाजता नागरिकांना प्रभात फेरीसाठी हा तलाव खुला करून देण्यात येतो. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत वृद्ध नागरिक, तरुण या तलावाकाठी फेरफटका मारण्यासाठी येत असतात. तलावाकाठीच लहान मुलांसाठी खेळ साहित्याची सोय करून देण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी नाममात्र शुल्कात या खेळांचा अनुभव लहान मुलांना घेता येतो. घोसाळे तलाव इतर तलावांच्या तुलनेत लहान असला तरी या तलावात नौकाविहाराची सुविधा देण्यात आली आहे.

सायंकाळच्या वेळी तरुण-तरुणी, लहान मुले या नौकाविहाराचा आनंद लुटतात. सकाळच्या वेळी तलावाच्या काठी चालताना एका बाजूला जपलेली हिरवाई आणि दुसऱ्या बाजूला तलावाचे संथ पाणी यामुळे या ठिकाणच्या वातावरणात प्रसन्नता अनुभवता येते. सकाळच्या वेळी प्रभातफेरीसाठी वृद्ध नागरिक, महिला या तलावकाठाचा पुरेपूर उपयोग करीत असले तरी सायंकाळच्या वेळी या तलावकाठावर गप्पांची मैफल जमते. सायंकाळचा फेरफटका झाल्यावर विश्रांतीसाठी तलावाकाठी असलेल्या बाकांवर येथील नागरिकांच्या गप्पा रंगतात. तलावाकाठी पावसाचा अनुभव घेत प्रवेशद्वाराजवळच असलेले मक्याचे कणीस खाण्याचा आनंद नागरिकांना अनुभवता येतो.

तलावाकाठी फिरण्याचा आनंद वेगळा असतो. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी फिरल्यावर दिवसभराचा थकवा घालवण्याचे उत्तम ठिकाण आहे. फेरफटका मारण्यासाठी घराजवळचे उत्तम  ठिकाण असल्याने या तलावाकाठी नियमित येणे असते.

– अश्विनी शिंदे,

शांततेचा अनुभव या तलावाकाठी घेता येतो. प्रभातफेरीसाठी शक्य नसले तरी सायंकाळच्या वेळी मित्रमैत्रिणींसोबत या तलावाकाठी फेरफेटका होत असतो. या तलावाकाठची स्वच्छता अधिक भावते.

– सिद्धी बोबडे