शरीरातील पाणी कमी होत असल्याने उडताना पडण्याचा धोका
बदलत्या हवामानामुळे सध्या ऋतुचक्रातही बदल झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस, तर कधी उष्म्याचा वाढता तडाखा यांमुळे माणसांना त्रास होतो, तसा पक्ष्यांना हा त्रास अधिक पटीने होत आहे. वाढत्या तापमानात उडताना पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना पक्षी गळून कोसळण्याचे प्रकार वसईत घडत आहेत.
शुक्रवारी वसई-विरारमधील तापमान ३२ अंश इतके होते. निसर्गात होणाऱ्या या बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना पक्षी गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.
पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांच शरीर अनेक प्रकारच्या पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. असा प्रकार वसई-विरार परिसरात सर्वात जास्त प्रमाणात घारींच्या बाबतीत घडला असल्याचे पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षिदया महत्त्वाची
पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मूच्र्छित होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी बाल्कनी, गच्ची अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन सचिन मेन यांनी केले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird affected by extreme heat temperatures
First published on: 07-05-2016 at 03:33 IST