ठाणे – ठाण्यातील सी पी गोयंका या शाळेतील सहली निमित्ताने निघालेल्या बसगाडीत लहान मुला मुलींचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जावेद खान (२७) या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  बसमध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया शाळा प्रशासनाकडून सुरू झालेली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कापुरबावडी भागात सी पी गोयंका इंटरनॅशनल शाळा आहे. काही दिवसांपूर्वी या शाळेची सहल गेली होती. त्यावेळी बस गाडीमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या जावेद याने विद्यार्थ्यांचा विनयभंग केला. मुलींनी या घटनेची माहिती त्यांच्या पालकांना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी जावेद याला अटक केली आहे.पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात ठिय्या मांडला आहे.मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शिंदे गटाचे माजी नगसेवक संजय भोईर आले आहेत.
जो पर्यंत शाळा व्यवस्थापक मुख्याध्यापकांवर कारवाई नाही करत तो पर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालक घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children molested at goenka international school in thane amy
First published on: 21-02-2024 at 13:01 IST