कधीकधी आपल्यासाठी आयुष्यातली एखादी सुंदर गोष्ट भूतकाळात जमा झालेली असते आणि बऱ्याच वर्षांनंतर ती अनपेक्षितपणे समोर येते, तेव्हा जे काही वाटतं ते खरं तर शब्दांत सांगता येत नाही. ‘कानसेन’साठी मुलाखतीच्या निमित्ताने ठाण्याच्या विनोद तिळवणकर यांच्या घरी गेले आणि काहीसं असंच झालं. मी रेडिओवर काम करायचे तेव्हा ‘विन ९४.६ एफ.एम.’वर पहाटे पाच वाजताचा ‘अस्मिता’ हा tv17कार्यक्रम सादर करायचे. तिळवणकरांच्या पत्नी माझे कार्यक्रम नेहमी ऐकायच्या. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांना माझा कार्यक्रम अगदी वैशिष्टय़ांसकट आठवत होता हे बघून मला खरंच खूप आनंद झाला. आमच्या गप्पांची सुरुवातच एका छान नॉस्टॅल्जिक नोटवर झाली.
तिळवणकरांनी प्रीमियरमध्ये सोळा वर्षे नोकरी करून व्ही.आर.एस. घेतली. नंतर प्रोफेशनल फोटोग्राफी केली. या सगळ्याच्या दरम्यान त्यांचा रेकॉर्ड कलेक्शनचा छंद जपणं सुरूच होतं. त्यांच्याकडे एल.पी., ई.पी., ७८१पीएम रेकॉर्डस, स्पूल्स, कॅसेट्स, सीडीज, डीव्हीडीज, व्हिडीओज अशा सगळ्या प्रकारांमध्ये म्युझिक कलेक्शन आहे. त्यांच्याकडे अभिजात शास्त्रीय संगीत आणि त्यातही लाइव्ह रेकॉìडग्जचं कलेक्शन आहे. अनेक मफलींना त्यांनी स्वत: हजर राहून रेकॉìडग केलेलं आहे. त्याविषयी ते सांगतात, ‘‘मी स्वत: सतारवादक आहे. माझे पहिले गुरू श्रीशंकर अभ्यंकर यांनी ‘संगीत जमेल तेवढं ऐकत रहा,’ असं सांगितलं होतं. त्याप्रमाणे मी मफली ऐकायला सुरुवात १९७८ पासून केली होती. माझ्या असं लक्षात आलं की, एखादी मफल संपली की ऐकणंही तिथेच संपतं. म्हणून मग १९७८ पासूनच मी मफलींची रेकॉìडग्ज जमवायला सुरुवात केली आणि साधारण १९९७ पासून स्वत: मफलींची लाइव्ह रेकॉìडग्ज करायलाही सुरुवात केली.’’
बोलता बोलता त्यांनी एक रेकॉìडग ऐकवले. बाबूजी म्हणजेच सुधीर फडके यांच्या एका अनौपचारिक मफलीचं ते रेकॉìडग होतं. ‘मधु मागसी माझ्या सख्या परी’ हे भावगीत िहदीत आणि तेही बाबूजींच्या आवाजात तिळवणकरांकडे आहे! शिवाय बाबूजींनी गायलेल्या यमन रागाचं अत्यंत दुर्मीळ असं पंचवीस मिनिटांचं रेकॉìडग आहे. पुणे गायन समाजात एकदा फैय्याजखान साहेबांचं गाणं होतं; पण काही कारणानं त्यांचा गळा नेमका तेव्हा नीट नव्हता. त्या वेळी त्यांनी माणिक वर्माना गायला सांगितलं. माणिकबाईंनी मारवा गायला होता. त्याचं रेकॉìडग माणिक वर्माना तिळवणकरांनी ऐकवलं! नाना मुळेंकडून त्यांना फैय्याज यांचं ‘चार होत्या पक्षिणी त्या’ या गाण्याचं रेकॉìडग मिळालं. मास्तर कृष्णरावांच्या एकसष्टीला बालगंधर्व गायले होते. बालगंधर्वाचं गायन, कृष्णरावांचं ७-८ मिनिटांचं भाषण हे रेकॉìडगपण नाना मुळेंकडून त्यांना मिळालं. पं. रविशंकर यांच्या सतारवादनाच्या भारतात झालेल्या मफलींच्या रेकॉर्ड्स जर्मनीत निघाल्या होत्या! त्या अलिबागच्या एका मित्राकडून त्यांना मिळाल्या.
तिळवणकरांनी हे कलेक्शन त्यांच्या वैयक्तिक संग्रहासाठी केलेलं असलं तरी कुणाला जर त्यातलं काही कॉपी करून घ्यायचं असलं किंवा ऐकायचं असलं, तर ते त्यांचं स्वागतच करतात. ते म्हणतात, ‘‘मला वाटतं की, आपलं कलेक्शन हे दिल्याने वाढतं! मी ते इतरांना उपलब्ध करून देतो तेव्हा त्यांच्याकडचं एखादं दुर्मीळ रेकॉìडग मला मिळण्याची शक्यता असते किंवा कुणाकडे काय आहे, रेकॉर्ड कलेक्टर्सच्या जगात काय काय चाललंय याची माहिती मिळते.’’
श्री. रामदत्तबुवा पर्वतीकर म्हणजेच वीणा महाराज यांच्याकडे तीन भोपळ्यांची वीणा होती. त्यांनी चाळीस वर्षे बद्रिनाथला संगीतातल्या चक्रधाराचा अभ्यास केला होता. ‘जय नारायण जय जय नारायण’ याच शब्दांच्या सगळ्या तिहाया असलेल्या वीणा महाराजांच्या ५० कॅसेट्स तिळवणकरांकडे आहेत. नुसरत फतेह अली खान यांचं सुफी कव्वालींचं दुर्मीळ असं २६ तासांचं व्हिडीओ रेकॉìडग आहे. ‘मेरा पिया घर आया हो रामजी’ हे गाणं ज्या मूळ कव्वालीवरून घेतलंय त्या कव्वालीची- नुसरत फतेह अली खान यांची एक व्हिडीओ क्लिपही त्यांनी दाखवली. सतारवादक रईस खानसाहेब यांनी गायलेली गजल त्यांच्या संग्रहात आहे. त्यासोबतच भीमसेनजी, उस्ताद बिस्मिल्ला खान, गजाननराव जोशी, पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. रविशंकर, विलायत खानसाहेबांचे रेकॉर्डिग आहे. अत्यंत दुर्मीळ असं पं. मिराशीबुवांचं काही रेकॉìडग आहे.
सवाई गंधर्व महोत्सवातली पं. नारायणराव व्यास, गंगूबाई हनगल यांची रेकॉìडग्ज, शिवाय तबल्यातले दिग्गज उ. हबीबुद्दीन खान, उ. आमिरहुसेन खान, उ. अहमदजान थिरखवा, उ. निझामुद्दीन खानसाहेब, उ. अल्लारखा, पं. सामता प्रसाद (तबला), उ. लतीफ अहमद, उ. अली अकबरखानसाहेब, झरीन दारूवाला (सरोद), उ. बहादूरखान, सुब्बलक्ष्मी, सरस्वती राणे, फरीदा खानुम, हिराबाई बडोदेकर, मोगुबाई कुर्डीकर यांचीही रेकॉìडग्ज आहेत. मदर तेरेसा यांचाही आवाज त्यांच्या संग्रहात आहे.
खरं तर ही यादी न संपणारी आहे! आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे या सगळ्या कलेक्शनचं अतिशय पद्धतशीर कॅटलॉिगग त्यांनी केलंय. ललित राव यांनी त्यांना लायब्ररी सिस्टम करण्याबद्दल सांगितलं आणि त्यांनीही ते मनावर घेऊन केलं. त्यामुळे त्यांच्या संग्रहात काय काय आहे हे अगदी चटकन कळू शकतं.