चार खासगी रुग्णालयात सुविधा उपलब्ध

लोकसत्ता प्रतिनिधी

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेची दोन रुग्णालय, दोन करोना काळजी केंद्रांमध्ये रहिवाशांना विनाशूल्क करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुविधा देण्यात आली आहे. डोंबिवली, कल्याणमधील चार खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली आहे.  यामुळे पालिका हद्दीत एकूण आठ ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होणार असून त्याचा फायदा ज्येष्ठ, सहव्याधी असलेल्या नागरिकांना होणार आहे.

कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, लाल चौकी येथील आर्ट गॅलरी, डोंबिवलीतील पाथर्ली शाळा क्रमांक ६२ येथे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ६० वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरणाची मोफत सुविधा पालिका प्रशासनाने दिली आहे. कल्याणमधील शक्तिधाम विलगीकरण केंद्र आणि डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे आरोग्य कर्मचारी तसेच आरोग्य सेवकांना लसीकरण केले जात आहे. डोंबिवली एमआयडीसीतील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालय, बाज आर. आर. रुग्णालय, टिटवाळा येथील श्री महागणपती रुग्णालय, कल्याणातील ईशा नेत्रालय या खासगी रुग्णालयांमध्ये शुल्क आकारून करोना लस देण्याची सुविधा आहे. त्यांना लसीचा पुरवठा पालिकेकडून केला जाणार आहे. रहिवाशांना योग्य वेळेत लसीकरण करुन घेता यावे म्हणून  खासगी रुग्णालयांमध्यही लसीकरणाची सुविधा आहे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी सांगितले.

शासन, जिल्हा आरोग्य विभागाच्या मान्यतेने एम्स रुग्णालयात लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणासाठी येताना ४५ ते ६० आणि त्यावरील वयाच्या नागरिकांनी आधारकार्ड किंवा वयाचा पुरावा दाखविणारे ओळखपत्र सोबत घेऊन यावे. प्रत्येक लसीमागे २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कोवीन अ‍ॅप किंवा उपलब्ध सुविधांवर नोंदणीकरण करावे. तसेच ज्या नागरिकांना नोंदणी करताना अडचणी येत असतील तर त्यांची लसीकरण केंद्रावर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना लस दिली जाणार आहे.

– महेश पांचाळ, व्यवस्थापक (जनसंपर्क), एम्स रुग्णालय