कल्याण: कल्याण मधील रामबाग विभागातील कोशे इमारतीला ४० वर्षापूर्वी नगरपालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता जमीन मालक आणि विकासकांनी निकृष्ट बांधकाम करुन इमारतीची उभारणी केली. या इमारतीचा काही भाग गेल्या जून मध्ये भरपावसात कोसळून या इमारतीमधील एका रहिवाशाचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी या कुटुंबीयांमधील एका सदस्याने विकासक आणि जमीन मालका विरुध्द बेकायदा इमारती मधील घर ग्राहकांना विक्री केल्याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गणेश सूर्यभान काकड (२६, रा. कोशे इमारत, रामबाग, कल्याण) असे तक्राराचे नाव आहे. सुरेश चिंतामण कोशे (प्रेम ज्योत सोसायटी, मराठी शाळे जवळ, रामबाग गल्ली क्रमांक ५, कल्याण) असे जमीन मालक आरोपीचे नाव आहे. २९ जून रोजी सकाळी सहा वाजता कोशे इमारतीचा काही भाग मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक कोसळला. या इमारती राहणारे तक्रारदार गणेश यांचे वडील सूर्यभान भिंतींच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. गणेश यांच्या आईला ढिगारा अंगावर पडल्याने गंभीर दुखापती झाल्या.

traffic, old Mumbai-Pune road ,
तीन वर्षांनंतर जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दुहेरी वाहतूक पूर्ववत
Redevelopment of building without help of private developers banks brokers
मुंबई : खासगी विकासक, बँक, दलालांची मदत न घेता इमारतीचा पुनर्विकास
navi mumbai illegal nursery marathi news
नवी मुंबई: कारवाईनंतरही रोपवाटिका उभी, एनआरआय परिसरात डीपीएस शाळेजवळील भूखंडावर पुन्हा अतिक्रमण
Difficulties in the redevelopment of redeveloped buildings
मुंबई : पुनर्विकसित इमारतींच्या पुनर्विकासात अडचणी!

हेही वाचा >>> लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीची टिटवाळ्या जवळील जंगलात हत्या

कोशे इमारतीच्या शेजारी असलेल्या शैनाज शेख यांच्या चाळीच्या घरावर कोशे इमारतीचा ढिगारा कोसळला. त्यामुळे चाळीच्या छपराचे आणि बाजुला उभ्या असलेल्या दुचाकीचे २५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. जमीन मालक सुरेश कोशे आणि या बांधकामाचा विकासक यांच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणाने ही दुर्घटना घडली असल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने गणेश काकड यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे.

१९८३ च्या दरम्यान नगरपालिकेच्या काळात कोशे इमारतीची नगरपालिकेची बांधकाम परवानगी न घेता बेकायदा इमारत बांधण्यात आली. या इमारत बांधकामासाठी निकृष्ट बांधकाम साहित्य वापरण्यात आले. आपण बांधलेली इमारत अनधिकृत आहे हे माहिती असुनही जमीन मालक सुरेश कोशे आणि विकासकांनी या बेकायदा इमारती मधील सदनिका सूर्यभान काकड, छाया चौधरी, राजन तांदळे यांना विक्री केल्या. निकृष्ट दर्जाचे बेकायदा बांधकाम असलेल्या इमारती मधील सदनिका या ग्राहकांना विकल्या, असे तक्रारीत म्हटले आहे. पालिकेच्या ब प्रभागाच्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये कोशे इमारतीचा समावेश नाही. त्यामुळे या इमारतीला या यादीतून कोणी वगळले. यामध्ये कोणत्या विकासकाचा काही विशिष्ट हेतू होता का. यामध्ये कोणत्या पालिका अधिकाऱ्याचा सहभाग होता, याचीही चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.