डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर कल्याण दिशेकडे असलेल्या तिकीट कार्यालयाचा दिशादर्शक फलकाची अशी धोकादायक अवस्था झाली आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशन मास्तर आणि रेल्वे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन हा फलक पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर (होम प्लॅटफॉर्म) कल्याण दिशेकडे तिकीट कार्यालय आहे. याच फलाटावर डोंबिवली स्थानक स्टेशन मास्तरांचे तसेच डोंबिवली लोहमार्ग पोलीस कार्यालय आहे. तिकिट कार्यालय आणि पश्चिमेला बाहेर पडण्यासाठीचे प्रवेशद्वार येथे असल्याने हा भाग कायम गजबजलेला असतो. प्रवाशांची जा-ये सतत सुरू असते.

हेही वाचा : डोंबिवलीत दत्तनगरमध्ये चायनिज सेंटरमध्ये सिलिंडरचा स्फोट; तीन जण गंभीर जखमी, दोन अत्यवस्थ

या धोकादायक फलकाच्या एका बाजूची साखळी निखळली असल्याचे या छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. ही साखळी निखळली, तुटली तर हा जड फलक जाणा-या येणाऱ्या किंवा तिथे उभ्या असलेल्या प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो किंवा कोणी गंभीर जखमी होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dangerous condition of ticket office signboard at dombivli railway station css