नाटय़गृहे, सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

ठाणे : यंदा र्निबधांमध्ये शिथिलता आल्याने दिवाळीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचे विविध संस्थांकडून आयोजन करण्यात आले आहे. ‘दिवाळी पहाट’निमित्त खुल्या परिसरात आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असली तरी शहरातील काही संस्थाचालकांनी नाटय़गृह तसेच सभागृहांत वेगवेगळय़ा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी करोनाची भीती कायम असल्यामुळे दिवाळी पहाटनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या खुल्या कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातली आहे. संस्थाचालकांनी सभागृहात किंवा नाटय़गृहात काही कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ५० टक्के नागरिकांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत. 

बहुतांश संस्थानी ऑनलाइनच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ब्रह्मांड कट्टा आणि ‘मधुगंधार’तर्फे ‘किलबिल स्वरांची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम गुरुवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता होणार आहे.

कुठे कार्यक्रम?

  • ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात गुरुवारी गायक महेश काळे यांचा ‘सूर निरागस हो’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
  • याच नाटय़गृहात शुक्रवारी गायक डॉ. सलील कुलकर्णी यांचा गायनाच्या कार्यक्रम होणार आहे. ल्ल ठाण्यातील स्वा. वि. दा सावरकर प्रतिष्ठान, ठाणे आणि घंटाळी प्रबोधिनी संस्था, ठाणे यांच्यातर्फे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या गाजलेल्या गीतांवर आधारित ‘स्वरभास्कर वंदना’ या कार्यक्रमाचे राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आले आहे.