ठाण्यात बाळगोपाळांसाठी डायनोसॉरचे युग अवतरणार

उन्हाळ्याची सुटी संपता संपता ठाण्यातील बच्चेकंपनीसाठी चक्क ‘डायनोसॉर’ अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

उन्हाळ्याची सुटी संपता संपता ठाण्यातील बच्चेकंपनीसाठी चक्क ‘डायनोसॉर’ अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ज्युरासिक पार्क या जगप्रसिद्ध चित्रपटांच्या मालिकेतून थरकाप उडविणाऱ्या डायनोसॉरची बालगोपाळांशी भेट घडवून आणण्याचा उपक्रम कोरम मॉलने आखला आहे. ज्युरासिक पार्क या विषयावर मॉलमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, येत्या ७ जूनपर्यंत सर्वाना ही धम्माल अनुभवता येणार आहे.

’बालगोपाळांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि खेळांमधून काही तरी माहिती मिळावी या उद्देशाने या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
* या उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या मुलांचे बुद्धिमत्ता, शक्ती, कला आणि गुणवत्ता या निकषांवर परीक्षण केले जाणार आहे.
* या शिबिराचे वैशिष्टय़ म्हणजे येथे जीवाश्म खोदणे, जंबो डायनो पझल, कार्पेट डायनोसॉर गेम, पेबल पेंटिंग, क्ले मॉडेलिंग, जंगल थीमवर नृत्याची कार्यशाळा यासारखे आगळेवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
* या शिबिरात सवरेत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना ‘समर चॅम्प’ही पदवी देण्यात येणार आहे.

डायनोसॉर आणि बरेच काही
कोरम मॉलने आखलेल्या या शिबिरातील यंदाच्या वर्षीचा विषय हा प्राचीन काळात नष्ट झालेल्या डायनोसॉरसारख्या प्राण्यांभोवती फिरता ठेवण्यात आला आहे. या शिबिराच्या माध्यमातून खास दृश्यांद्वारे या प्राण्यांची माहिती दिली जाणार आहे. डायनोसॉरची उत्पत्ती, त्यांची वाढ, त्यांचे प्रकार अशा सर्व अंगांनी माहिती देण्याचा प्रयत्न यावेळी केला जाणार आहे. हा उपक्रम अगदीच अभ्यासाच्या अंगाने जाऊ नये, यासाठी खेळांचे आयोजनही करण्यात आले आहे. आठवडय़ाच्या शेवटी ‘जंगल एरा डान्स’ हा खास कार्यक्रम होणार असून त्यात नृत्याचे आधुनिक प्रकार तसेच इतरही बरंच काही पाहायला मिळेल, अशी माहिती कोमर मॉलचे व्यवस्थापक देव ज्योतुला यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dinosaur world for childrens in thane

ताज्या बातम्या