ठाणे : कळवा येथे महावितरणकडून ठाणे शहरात केला जाणाऱ्या विद्युत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहरातील ४० टक्के भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल झाले. दुपारी ४ नंतरही विद्युत पुरवठा सुरळीत झाला नव्हता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… लोकसभा निवडणुक काळात भाजपाची राम गर्जना, आमदार संजय केळकर यांच्या हस्ते ‘राम गर्जना’गीताचे अनावरण

हेही वाचा… डोंबिवलीत निळजे येथे नरेंद्र मोदींची विनापरवानगी जाहिरात लावणाऱ्या जाहिरात एजन्सीवर गुन्हा, आय प्रभागाकडून कारवाई

महावितरणच्या कळवा येथून ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना विद्युत पुरवठा केला जातो. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास काही तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, जुने ठाणे, वागळे इस्टेट परिसराचा काही भाग, कोलशेत येथील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ऐन उन्हाळ्या विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैराण झाले आहे. नोकरदार, व्यवसायिकांच्या कामकाजावरही त्याचा परिणाम झाला आहे. लोकवस्तीमध्ये राहणारे नागरिक घरातून बाहेर पडत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electricity cut in 40 percent area of thane city asj