घोडबंदर नजीक काजूपाडा येथे झालेल्या तीन वर्षीय मुलाच्या हत्येची सुपारी त्याच्या चुलत आजोबानेच दिल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे .
मालमत्तेच्या वादातून पंधरा लाख रुपयांची सुपारी मुलाचे आजोबा वासू चौधरी याने दिल्याचे तपासात उघड झाले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
काजूपाडा येथील हितेश चौधरी या तीन वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह काजूपाडा येथील एका आश्रमामागे जंगलात सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी बाबासाहेब वाकले या चौधरी यांच्या शेजारी राहणाऱ्याला अटक केली होती. सुरुवातीला बाबासाहेब याने हत्या केल्याचे अमान्य केले. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच बाबासाहेब याने गुन्हा तर कबूल केलाच शिवाय या हत्येमागील खऱ्या गुन्हेगाराचे नाव देखील सांगितले. हितेश चौधरी याचा चुलत आजोबा वासू चौधरी याने या हत्येच्या बदल्यात पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केले असल्याची माहिती बाबासाहेब याने पोलिसांना दिली.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2016 रोजी प्रकाशित
आजोबाकडून नातवाच्या हत्येची सुपारी
काजूपाडा येथील हितेश चौधरी या तीन वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 01-04-2016 at 00:22 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandfather murders grandson