सलग १४ दिवस एक आकडी रुग्णसंख्या, करोनामृत्यूही घटले

बदलापूर : गेल्या १४ दिवसांपासून  करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात सलग १४ दिवसात रुग्णसंख्या एक आकडय़ावरच मर्यादित राहिली आहे. गेल्या १४ दिवसात अंबरनाथ शहरात एकही करोना मृत्यू झालेला नाही.  करोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही शहरांनी युद्धपातळीवर तयारी केली होती. जानेवारीच्या मध्यानंतर करोनाच्या रुग्णांमध्ये सकारात्मक अशी घट झाली आहे. गेल्या १४ दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील करोना रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे.

वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह
1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव

गेल्या १४ दिवसात अंबरनाथ शहरात अवघ्या २४ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे या काळात एकदाही दोन आकडी रुग्णसंख्या नव्हती. तर दोन दिवस एकही रुग्ण आढळले नाहीत. शिवाय अंबरनाथ शहरात एकही मृत्यू झालेला नाही. बदलापूर शहरात गेल्या १४ दिवसात अवघे २० रुग्ण आढळले आहेत. १४ दिवसांतील सहा दिवसांत एकही रुग्ण नोंदवला गेलेला नाही. तर बदलापुरात तीन मृत्यू नोंदवले गेले आहेत. त्यामुळे करोनाचा अटकाव शहरांमध्ये योग्यरीत्या होत असल्याचे बोलले जाते.

प्रभावी लसीकरण

सुरुवातीच्या काळात मागे पडलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराने लसीकरणात आता आघाडी घेतली आहे. अंबरनाथमध्ये आतापर्यंत २ लाख ७८ हजार १४६ लसमात्रा देण्यात आल्या आहेत. यात दोन्ही लसमात्रा घेतलेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार ८३४ इतकी आहे. तर कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात तब्बल ३ लाख १९ हजार १४८ लसमात्रा देण्यात आल्या आहेत. यात दुसरी मात्रा घेतलेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार ९०२  इतकी आहे.