ठाणे : घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागात महापालिकेच्या पथकाला धमकी देणारा फेरीवाला हरिभाऊ हुले याच्याविरोधात शुक्रवारी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला होता. या प्रकारानंतर महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली. काही दिवसांपूर्वी हिरानंदानी इस्टेट भागात महापालिका पथक कारवाईसाठी गेले होते. पथक हरिभाऊ हुले याच्याविरोधात कारवाई करत असताना हरिभाऊ हुले याने चाकूचा धाक दाखवित तुमची मानच छाटू अशी धमकी दिली. या घटनेची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी महापालिकेचे लिपीक काशिनाथ राठोड यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, हुलेविरोधात धमकावणे, सरकारी कामात अडथळला आणल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा