कल्याण : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून विठ्ठलवाडी येथील पाच तरुणांनी एका मजुराला अडविले. त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी ही घटना विठ्ठलवाडी बस आगाराच्या समोरील रस्त्यावर घडली आहे. संदीप हरी विश्वकर्मा (३०) असे मजुराचे नाव आहे. तो खडेगोळवलीत औदेराम नगरमध्ये कुटुंबियांसह राहतो. त्याच्यावर मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ओम उर्फ तुषार भोसले, ऋतिक उर्फ चुहा साबळे, प्रेम सिंग उर्फ गुंडा, विशाल यादव उर्फ दही आणि पुई अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी २३ ते २५ वयोगटातील आहेत. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार मजूर संदीप विश्वकर्मा हे दिवसभराची मजुरी करून पायी आपल्या खडेगोळवली येथील घरी चालले होते. मुलांसाठी खाऊ घेतला होता. विठ्ठलवाडी बस आगाराजवळ आल्यावर संदीपला आरोपी पाच तरूणांनी अडविले. आम्हाला दारू पिण्यासाठी पैस दे, नाहीतर तुला येथून सोडणार नाही, अशी धमकी आरोपींनी दिली.

Blowing Nose Can Harm Ears And Throat How To Clear Congestion
नाक शिंकरल्याने ‘असा’ वाढू शकतो त्रास! बंद नाक मोकळे करण्यासाठी योग्य उपाय कोणते? तज्ज्ञांनी सांगितलं उत्तर
Child molested by baiting with chocolate Nagpur
चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर अत्याचार
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
With the skin or without and cooked Apples relief against gastrointestinal such as diarrhoea and constipation issues
सफरचंदाच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अतिसाराची समस्या झटक्यात होईल दूर; तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स करा फॉलो

हेही वाचा : ठाण्यातील खासगी डाॅक्टर देणार पालिका रुग्णालयात सेवा

मी दिवसभर कष्टाचे काम करून घरी चाललो आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्या जवळ पैसे नाहीत, असे संदीपने तरूणांना सांगितले. या वाक्याचा राग येऊन आरोपी तरूणांनी संदीपला मारहाण सुरू केली. त्याला खाली पाडून मारण्यात आले. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. यावेळी संदीप एकटाच असल्याने त्याला वाचविण्यासाठी कोणी पुढे आले नाही. संदीपच्या खिशातील दिवसभराच्या मजुरीतून मिळालेले एक हजार रूपये आणि त्याचा मोबाईल आरोपींनी काढून घेतला. ते पळून गेले. जखमी अवस्थेत संदीपने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. कल्याण, डोंबिवलीत गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.