कल्याण-डोंबिवली पालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका सुशीला कुंडलिक माळी यांनी पालिका निवडणुकीसाठी सादर केलेली जातीची प्रमाणपत्रे कोकण विभागीय जात पडताळणी समितीने अवैध व रद्द ठरविल्याने, पालिकेने गुरुवारी नगरसेविका माळी यांचे नगरसेवक पद अनर्ह (रद्द) केले. माळी या कल्याण पूर्वेमधील प्रभाग क्र. ८९ मंगलराघोनगर प्रभागाच्या नगरसेविका होत्या.
पालिका निवडणुकीच्या वेळी माळी यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली होती.
माळी यांनी दहा वर्षांपूर्वीची पालिका निवडणूक ओ.बी.सी. प्रवर्गातून, तर आता राखीव प्रवर्गातून लढविली असल्याचा प्रतिस्पर्धी उमेदवाराचा आक्षेप होता.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2016 रोजी प्रकाशित
सेनेच्या नगरसेविकेचे पद रद्द
पालिका निवडणुकीच्या वेळी माळी यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 22-04-2016 at 00:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali shiv sena corporator post cancelled