कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कार्यालयात ऑन ड्युटीवर असताना दारु पीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कल्याणच्या गणेशवाडी इमारतीचे रहिवाशी पाणी येत नाही म्हणून तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेले होते, तेव्हा त्यांना हा प्रकार दिसून आला.
या प्रकारामुळे वैतागलेल्या रहिवाशांनी याचा जाब विचारला. पण, मद्यधुंद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना धक्काबुक्की करत कार्यालयातून पळ काढला. एका अधिकाऱ्याने तर चारचाकी रहिवाशाच्या अंगावर घातली, मात्र सुदैवाने तो बचावला.
मात्र या घटनेमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेतला भोंगळ कारभार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kdmc employees on duty liquor party
First published on: 30-07-2016 at 18:53 IST