खेळाडू, क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी; डोंबिवलीत शांतता क्षेत्राचा भंग

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील खेळाची मैदाने मालमत्ता विभागाने विवाह सोहळे, वाहन विक्रेत्यांना भाडय़ाने देण्याचा सपाटा लावला आहे. पहिल्यांदाच असे प्रकार घडत असल्याने खेळाडू, क्रीडाप्रेमी रहिवासी, प्रशिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. आयुक्त पी. वेलरासू यांनी मालमत्ता विभागाच्या मनमानीवर व नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
ms dhoni thala joined hands being thankful to fan in ekana cricket stadium lsg vs csk ipl 2024 live match
थालाच्या भरमैदानातील ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने; VIDEO पाहून म्हणाले, “वॉव…”
Virat's Funny reaction Video Viral
MI vs RCB : विराट कोहलीने अचानक मैदानात आपले दोन्ही कान का पकडले? VIDEO होतोय व्हायरल
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

महसूल मिळविण्यासाठी पालिकेला अनेक मार्ग असताना खेळाडूंच्या हक्काच्या ठिकाणावर प्रशासनाकडून डल्ला मारण्यात येत असल्याने क्रीडाप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राऊंड) गेल्या आठवडय़ात तीन दिवस मालमत्ता विभागाने दुचाकी वाहन विक्रीसाठी उपलब्ध करून दिले होते.

त्यामुळे मैदानात सकाळ, संध्याकाळ शतपावली, खेळासाठी येणाऱ्या खेळाडूंची कुचंबणा झाली होती. या भागातील रहिवासी, क्रीडाप्रेमींनी पालिका अधिकाऱ्यांना संपर्क करून यशवंतराव चव्हाण खेळाचे मैदान असताना वाहन विक्रीसाठी खासगी कंपन्यांना का उपलब्ध करून दिले, अशी विचारणा केली. त्या वेळी मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांना पिटाळून लावले.

असाच प्रकार डोंबिवलीतील मध्यवर्ती असलेल्या नेहरू मैदान येथे करण्यात आला. नेहरू मैदान एका विवाह सोहळ्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. विवाहाच्या दोन दिवस अगोदरपासून मैदानात मंडप उभारणीचे काम सुरू होते. त्यामुळे मुलांना मैदानात खेळणे अवघड झाले.

रा. स्व. संघाचे विद्यार्थी मैदानात संघ शाखेसाठी येतात. शतपावलीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ  नागरिकांची अडचण झाली. विवाहाच्या दिवशी डीजेचा दणदणाट सुरू होता. सध्या अभियंता वर्गाची परीक्षा सुरू आहेत. त्यांना या दणदणाटाचा सर्वाधिक त्रास झाला. एक पालिका कर्मचारी नेहरू मैदान भागात राहतो. त्याच्या सांगण्यावरून हे मैदान विवाहासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते, असे समजते.

नेहरू मैदानात मोठा शाही विवाह सोहळा पार पडला. डीजेचा दणदणाट  होता, असे येथील रहिवासी उदय कर्वे यांनी सांगितले.

याप्रकरणी मालमत्ता व्यवस्थापक अनिल लाड यांच्या भ्रमणध्वनीवर व कार्यालयात संपर्क साधला. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

मुलांना खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी जागा नाही. ही मंडळी यशवंतराव चव्हाण मैदानाचा वापर करतात. त्याच मैदानात पालिकेने कंपन्यांना वाहन विक्रीसाठी तीन दिवस जागा देऊन क्रीडाप्रेमींची अडचण केली आहे. पालिकेने खेळाडू, क्रीडाप्रेमींच्या हक्कावर गदा आणू नये.

स्टेला मोराईस, रहिवासी