सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांची भावना, ठाण्यात उद्या होणाऱ्या ‘लोकसत्ता अभिजात’ कार्यक्रमात सहभाग

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
mumbai gudi padwa celebration
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण, शिवराज्याभिषेकाचे प्रतिबिंब; गुढीपाडव्यानिमित्त स्वागत यात्रांमध्ये तरुणाईचा सहभाग वाढवण्यावर भर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

ठाणे : लता मंगेशकर या संगीत क्षेत्रातील एक जागृत देवस्थान आहेत. लहानपणापासून दीदींची गाणी ऐकत आणि गात संगीत क्षेत्रात आलो आहोत. त्यांच्या इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. मात्र संगीत क्षेत्रात इतक्या उच्च स्थानावर असूनसुद्धा त्यांनी त्यांचे मराठीपण जपून ठेवले होते, अशा भावना सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केल्या.

‘लोकसत्ता अभिजात’ उपक्रमाअंतर्गत गुरुवार, ३ मार्च रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ‘लता : एक आठवण’ या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गायिका बेला शेंडे पाहुणे कलाकार म्हणून उपस्थिती लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने त्यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या हृदयाच्या जवळ असलेली लतादीदींची गाणी निवडल्याचे म्हटले.

लता मंगेशकर या भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीच्या प्रतीक होत्या, असे सांगताना बेला शेंडे म्हणाल्या, ‘लताबाई या एक प्रकारे सुरांचं मंदिर होत्या. त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं आज अजरामर आहे. त्यांच्या प्रेमगीतांमध्ये देखील समर्पणाचा भाव आणि निखळता दिसून येते. त्यांना एक प्रकारे ही दैवी देणगीच लाभली होती.’

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये गुरुवारी लोकसत्ताच्या अभिजात उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या ‘लता : एक आठवण’ या खास संगीत कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल शेंडे यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले. ‘लता मंगेशकर यांची असंख्य गाणी अजरामर आहेत. त्यांपैकी काही गाणी निवडणे ही अत्यंत कठीण प्रक्रिया होती. यातील जी गाणी हृदयाच्या अगदी जवळ आहेत ती गाणी निवडली आहेत. या विशेष कार्यक्रमातून रसिक श्रोत्यांना सुंदर गाण्यांचा नजराणा मिळणार आहे,’ असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमात बेला शेंडे यांच्यासह संजीवनी भेलांडे, संपदा गोस्वामी आणि केतकी भावे-जोशी हे कलावंतही लतादीदींची निवडक हिंदूी आणि मराठी, तसेच रागदारीवर आधारित गीते या कार्यक्रमात सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी ठाणेकर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने तिच्या प्रवेशिका मंगळवारी एका दिवसातच संपल्या आहेत.

कधी : गुरुवार, ३ मार्च २०२२

वेळ : सायंकाळी ६.३० वाजता

ठिकाण : गडकरी रंगायतन

प्रस्तुती :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

सहप्रायोजक : सिडको, टीजेएसबी सहकारी बँक लि.

पॉवर्ड बाय : नेटभेट ईलर्निग सोल्युशन्स

बँकिंग पार्टनर्स : ठाणे भारत सहकारी बँक लि.