‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

स्वत:चे घर घेणे, हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते व त्यासाठी तो आयुष्यभर धडपड करत असतो. मात्र, आयुष्यभर पैसे साठवून घरखरेदी केल्यानंतर त्यासोबत आणखी एक घर किंवा काही मौल्यवान वस्तू बक्षीस रूपात मिळाले तर ते स्वप्न सुवर्णसत्य ठरते. नेमकी हीच अनुभूती ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ या योजनेतील सोडतीत यशस्वी ठरलेल्या विजेत्यांना आली. गणेश घोणे यांना या योजनेतून एका घरावर दुसरे घर मोफत मिळाले.

ठाण्यातील माजिवडा येथील मारिया रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात गणेश घोणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना नील सिद्धी ग्रुपचे दर्शन पालन आणि ‘लोकसत्ता’चे तुषार कुडके यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या उपक्रमाचे दुसरे पारितोषिक सचिन गावडे यांना मिळाले असून त्यांना ‘केसरी’कडून दुबई येथे परदेश सहलीचे पारितोषिक मिळाले आहे. ‘केसरी’चे प्रमोद दळवी, निसर्ग ग्रीन्सचे प्रमोद सत्रा आणि ‘लोकसत्ता’चे सुब्रोतो घोष यांच्या हस्ते या पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. या वेळी राकेश म्हात्रे, विशाल शिंदे, वत्सला चव्हाण, शीतल जाधव, मनीषा पगारे, मिलिंद आठवले, अरुणा कदम यांना टीव्हीचे पारितोषिक मिळाले.

‘तुलसी इस्टेट्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’चे असोसिएट पार्टनर ‘करम’ हे होते, तर प्लॅटिनम पार्टनर ‘थारवानी इन्फ्रास्ट्रक्चर’, गोल्ड पार्टनर ‘निसर्ग ग्रीन्स’, सिल्व्हर पार्टनर ‘नीलसिद्धी’, पॉवर्ड बाय रोझा ग्रुप, हाऊसिंग लोन पार्टनर ‘एलआयसी एचएफएल’, ट्रॅव्हल पार्टनर ‘केसरी’, तर गिफ्ट पार्टनर ‘बुश’ हे होते.

लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभचे विजेते

* गणेश आणि रोहिणी घोणे- घर

* सचिन गावडे- केसरी टूर्सची दुबई सहल

* राकेश म्हात्रे आणि विजयता म्हात्रे- टीव्ही

* विशाल शिंदे- टीव्ही

* वत्सला चव्हाण- टीव्ही

* शीतल जाधव आणि संतोष जाधव- टीव्ही

* मनीषा पगारे- टीव्ही

* मिलिंद आठवले- टीव्ही

* अरुणा आणि नागेश कदम- टीव्ही

मान्यवरांची उपस्थिती

विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यासाठी नील सिद्धी ग्रुपचे दर्शन पालन, केसरीचे प्रमोद दळवी, निसर्ग ग्रीन्सचे मयूर सत्रा, संजित कम्युनिकेशन्सचे दिलीप छाब्रिया, थारवानी इन्फ्राचे अजय मसान, श्री सावन बिल्डर्सचे हरनाम सिंग, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे संतोष गोखले, साद कम्युनिकेशन्सचे प्रसाद ओक आणि रोझा ग्रुपचे अमित शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

लहानपणापासून ‘लोकसत्ता’ वृत्तपत्र वाचत आहे. त्यामुळे या दैनिकासोबत पूर्वीपासूनच जवळचा संबध आहे. आम्हाला अपेक्षा नव्हती इतके मोठे पारितोषिक मिळेल. त्यामुळे अतिशय आनंद झाला.

– गणेश घोणे, घर विजेते

गेल्या काही महिन्यांपासून आम्ही परदेशात जाण्याचा विचार करतच होतो. सुदैवाने या स्पर्धेत आम्हाला दुबईचे पारितोषिक मिळाले. याचा आनंद होत आहे, त्यामुळे ‘लोकसत्ता’चे आभार.

– सचिन गावडे, सहल विजेते

‘लोकसत्ता’सोबत आम्ही वर्षांनुवर्षे आहोत. ‘लोकसत्ता’सोबतचा आमचा हा ५० वा कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचे एक वेगळे वैशिष्टय़ होते. या प्रवासात अनेक मंडळींची साथ मिळाली.

– प्रमोद दळवी, केसरी