अस्वच्छतेच्या तक्रारी दूर करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेकडून ‘एमओयूडी’ अ‍ॅपचा वापर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहर स्वच्छतेसाठी ‘सार्वजनिक स्वच्छता’, ‘वैयक्तिक शौचालय’ या योजनांच्या पाठोपाठ आता आपला परिसर स्वच्छ रहावा यासाठी मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहेत. आपल्या भागातील अस्वच्छतेविषयी या मोबाइल अ‍ॅपमध्ये छायाचित्रासह तक्रार केल्यास आपली तक्रार त्वरित दूर करण्यात येणार आहे. मात्र मीरा-भाईंदर महानगरपालिकेने या आधी सुरू केलेल्या मोबाइल अ‍ॅपची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हे नवे मोबाइल अ‍ॅप कितपत काम करेल हे लवकरच समजणार आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सरकारच्या नगरविकास मंत्रालयाने स्वच्छता एमओयूडी (मोड) ह मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले आहे. या अ‍ॅपचे वैशिष्टय़ असे की देशभरात हे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले असून या अ‍ॅपमध्ये स्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रार केली की नागरिक ज्या भागात राहातो, त्या संबंधित महापालिकांना ती तक्रार पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका प्रशासन संबंधित अधिकाऱ्याला तक्रार निवारण्याची जबाबदारी देणार आहे. आपल्या भागात कचऱ्याचा ढीग लागला असेल, कचरा उचलणारी गाडी आली नाही, कचऱ्याचे डबे स्वच्छ केले गेले नाही, आपल्या भागातील सार्वजनिक शौचालय स्वच्छ केले गेले नसेल, ते तुंबले असेल, शौचालयात पाणी अथवा वीज नसेल तर या अ‍ॅपचा उपयोग करुन त्याबाबतची तक्रार करता येणार आहे. तक्रार करण्यासाठी तक्रारदाराने अ‍ॅपमध्ये छायाचित्र काढले की त्यासोबत संबंधित तक्रारीच्या ठिकाणाची नोंद आपोआप के०ली जाणार आहे, तक्रारदाराने फक्त जवळपासचे एखादे मुख्य ठिकाण तक्रारीत नमूद केले की संबंधित आरोग्य अधिकाऱ्याकडे ही तक्रार पाठविण्यात येणार आहे. आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले याबाबत तक्रारदाराला ताजी माहितीदेखील देण्याची सुविधा यात आहे. संबंधित अधिकाऱ्याने तक्रारीचे निवारण केल्याचे अ‍ॅपवर सांगितले आणि आपण त्याबाबत समाधानी नसाल तर तीच तक्रार पुन्हा सुरू करणेदेखील या अ‍ॅपमध्ये शक्य आहे.

अ‍ॅप कसे काम करते?

  • आपल्या भागात कचऱ्याचा ढीग लागला असेल, कचरा उचलणारी गाडी आली नाही, कचऱ्याचे डबे स्वच्छ केले गेले नाही, आपल्या भागातील सार्वजनिक शौचालय स्वच्छ केले गेले नसेल, ते तुंबले असेल, शौचालयात पाणी अथवा वीज नसेल तर या अ‍ॅपचा उपयोग करून त्याबाबतची तक्रार करता येणार आहे.
  • तक्रार करण्यासाठी तक्रारदाराने अ‍ॅपमध्ये छायाचित्र काढले की त्यासोबत संबंधित तक्रारीच्या ठिकाणाची नोंद आपोआप केली जाणार आहे.
  • तक्रारदाराने फक्त जवळपासचे एखादे मुख्य ठिकाण तक्रारीत नमूद केले की संबंधित आरोग्य अधिकाऱ्याकडे ही तक्रार पाठविण्यात येणार आहे.
  • आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले याबाबत तक्रारदाराला ताजी माहितीदेखील देण्याची सुविधा यात आहे.
  • संबंधित अधिकाऱ्याने तक्रारीचे निवारण केल्याचे अ‍ॅपवर सांगितले आणि आपण त्याबाबत समाधानी नसाल तर तीच तक्रार पुन्हा सुरू करणेदेखील या अ‍ॅपमध्ये शक्य आहे.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Moud app mira bhayandar municipal corporation
First published on: 13-12-2016 at 00:38 IST