पालिकेच्या विविध विभागांत नागरी समस्या, विकासकामे, सदनिका, विकासक किंवा पालिकेशी संबंधित कोणत्याही समस्येबाबत पालिकेच्या संबंधित विभागाने कोणतीच कार्यवाही केली नसेल तर आयुक्त ई. रवींद्रन दर सोमवारी अशा सामान्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक करणार आहेत. पालिका मुख्यालयात हा भेटीचा कार्यक्रम होणार आहे.
आयुक्तांना भेटण्यापूर्वी तक्रारदाराने यापूर्वी संबंधित विभागातील अधिकाऱ्याशी पत्रव्यवहार करून, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. संबंधित विभागातील, प्रभागातील अधिकाऱ्याने १५ दिवसांत दाद दिली नसेल तरच तक्रारदारास आयुक्तांना भेटता येणार आहे, असे पालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत आयुक्त सामान्यांना भेट देतील. आयुक्तांची भेट घेण्यापूर्वी अर्जदाराने विभागाशी केलेला सगळा पत्रव्यवहार सोबत ठेवणे आवश्यक आहे.