आजच्या काळात एखादा कार्यक्रम साजरा करायचा असेल तर ‘निवेदक’ किंवा ‘संवादक’ या माध्यमाची गरज अनिवार्य झाली आहे. तुमच्याकडे नीटनेटकं व्यक्तिमत्त्व, रसाळ वाणी, हजरजबाबीपणा, अभ्यासू वृत्ती आणि उत्तम सोशल नेटवर्क असेल, तर वर्षभर तुम्हाला कामाची संधी मिळू शकते. खरंच विचार केला तर आपल्याला आढळेल, की आकाशवाणी, दूरदर्शन, सरकारी कार्यक्रम, संकल्पनेवर आधारित वाद्यवृंद, गायन, नृत्य यांचे कार्यक्रम, अगदी घरगुती मंगळागौर, डोहाळ जेवणापासून नाटय़गृह किंवा मोठय़ा स्टेडिअममध्ये होणारे ‘मेगा शो’ असं काहीही असलं तरी निवेदकाची गरज लागतेच. बऱ्याचदा तर कार्यक्रमाची तिकिटे निवेदक कोण आहे, हे बघून खरेदी केली जातात, इतकं या ‘निवेदक’ किंवा ‘सुसंवादक’ भूमिकेचं महत्त्व वाढलं आहे. पण या सगळ्या कार्यक्रमांशिवाय निवेदकासाठी आणखी एक ‘बीट ऑफ’ क्षेत्र आहे ते म्हणजे लग्नकार्य सोहळय़ाच्या निवेदनाचं!
ही कल्पनाच ‘बीट ऑफ’ आहे ना? म्हणजे क्रिकेट समालोचक कसा खेळाचं चित्ररूप धावतं वर्णन करत आपल्याला त्या खेळात खिळवून ठेवतो तसाच हा निवेदक विवाहविधी, त्यामागची संकल्पना रीतिरिवाज आपल्या ओघवत्या निवेदनातून आपल्याला सांगत संपूर्ण सोहळा आपल्यासमोर खुला करतो. अशा एका मेगा इव्हेंटचं सुसूत्र निवेदनाचे ‘बीट ऑफ’ क्षेत्र निवडले आहे आकाशवाणी निवेदनातून रोज आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या राजेंद्र पाटणकर यांनी. ते ‘किशोर मनराजा वेिडग सेरिमनी’ या इव्हेंट मॅनेजमेट कंपनीमध्ये ‘निवेदक’ म्हणून भूमिका पार पाडतात.
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना किंवा मेगा इव्हेंट असते. िहदू संस्कृतीमध्ये विवाह हा मनुष्यावर केल्या जाणाऱ्या १६ संस्कारांपकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. या संस्कारामुळे वधू आणि वरासोबतच अनेक नाती, माणसं नि कुटुंबं जोडली जातात. एकूणच या नात्याच्या बंधनांनी समाज एकजूट होत असतो. पूर्वीच्या काळी ‘लग्न’ हा विधी पार पाडण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ गावातच असायचं. त्याशिवाय दूरवरचे नातेवाईक घरी येऊन राहायचे आणि लग्नकार्य सुरळीत पार पाडायला मदतही करायचे. पण काळानुसार ही परिस्थिती बदलली. आधी आचारी, मग कॉन्ट्रॅक्टर नि आता लग्नकार्यालयातच सर्व व्यवस्था करण्याची सोय, असे बदल होत गेले. महाराष्ट्र पद्धतीच्या लग्नविधीमध्ये लग्न लावणारे गुरुजी लग्न लावताना विस्तृतपणे लग्नविधीचा अर्थ सांगत  असतात. पण आता आíथक सुबत्ता असलेल्या कुटुंबात ‘लग्न’ हा मेगा इव्हेंट चक्क इव्हेंट मॅनेजमेंट टीमला देण्याचा ट्रेंड बनला आहे. महाराष्ट्रापेक्षा लग्नविधीचे बजेट किती तरी पटीने जास्त असलेल्या जैन, गुजराती, मारवाडी आणि उत्तर प्रदेशातील श्रीमंत लग्न सोहळ्यात ‘लग्न’ या मेगा इव्हेंटचे सुसूत्र आयोजन करताना, लग्न सोहळादर्शनाबरोबरच या सोहळय़ाच्या श्रवणाचा घाटही घातला जातो. यासाठी गेली काही र्वष ‘किशोर मनराजा वेिडग सेरिमनी’ या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने लग्न सोहळय़ांना निवेदक पुरवण्यास सुरुवात केली. अशा सोहळय़ात एक मुख्य मंडप असतो. त्यात वधू-वर, त्यांचे आईवडील आणि लग्न लावणारे गुरूजी, एवढीच मंडळी असतात. बाकी सर्व आप्तेष्ट आणि पाहुणे मंडपाच्या चारी बाजूंनी खुच्र्यावर बसून या सोहळ्याचे विधी ऐकण्याचा आनंद घेत असतात. मंत्रविधी गुरुजींनी सांगितले की त्याचा अर्थ आणि महत्त्व सांगणारे ओघवते निवेदन दोन विधींच्या नेमक्या मधल्या वेळेत निवेदक सांगत असतो. जोडीला कधी त्याच्याशी अनुरूप संगीत काव्य, सामूहिक गायन अशा माध्यमातून हे लग्नाचे समालोचन सुरू असते. यासाठी योग्य असा निवेदक किशोर मनराजा यांना ‘टिप-टॉप प्लाझा’मध्ये म्हैसकर कुटुंबीयांच्या एका मुंजीमध्ये राजेंद्र पाटणकर यांच्या रूपात मिळाला आणि त्यानंतर  पाटणकर यांच्यासाठी या नावीन्यपूर्ण संधीची दारं उघडली गेली. पाटणकर यांचे वडील कीर्तनकार असल्यामुळे धार्मिक विधी, श्लोक, त्याचे उच्चारण, पाठांतर, अर्थ हे लहान वयातच त्यांना येऊ लागले होते. या सगळ्याचा उपयोग लग्नविधीचे रंजक निवेदन करताना त्यांना होतो. त्यांनी उमेदवारीच्या काळात मराठी भाषेतील पदव्युत्तर शिक्षणानंतर आकाशवाणी आणि नाटकातून भूमिका असा व्यवसाय प्रवास सुरू केला होता. पण नाटकातील लिखित आणि साचेबंद संवादापेक्षा उत्स्फूर्तपणे बोलण्याची आणि निवेदनाची आवड आणि क्षमता जोपासायचे त्यांनी नक्की केले. आकाशवाणी आणि स्वतचा छोटा उद्योग सुरू करून निवेदक म्हणून सुरू झालेल्या या प्रवासाला या नवीन इव्हेंटमुळे आíथक स्थर्य आले. हे लग्न सोहळे उदयपूर, जयपूर, राजस्थान अशा ठिकाणच्या राजवाडय़ात, तर कधी महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या भव्य मंडपात, दिल्ली, चेन्नई इथल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये तर कधी दुबई, थायलंड, मलेशियाच्या समुद्रकिनारी असतात. यामुळे देशविदेश पाहून अनुभव समृद्धी त्यांना मिळविता आली. फक्त मराठी भाषेतील निवेदनावरच न थांबता िहदी भाषेचा अभ्यास करून िहदी निवेदनातदेखील त्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. आकाशवाणी, सांस्कृतिक कार्यक्रम, सरकारी कार्यक्रम, गायन-वादन-नृत्य कार्यक्रमांचे निवेदन, कीर्तन असा निवेदनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या राजेंद्र पाटणकर या चतुरस्र निवेदकाने ‘लग्न सोहळा’ विधीमधील आपल्या मराठी आणि िहदी भाषेतील निवेदन सहभागाने मराठी निवेदकाच्या क्षमता कक्षा निश्चितच विस्तृत केल्या आहेत. निवेदकाची आजच्या काळातील आवश्यकता अधोरेखित करतानाच त्यांनी नवीन पिढीतील होतकरू निवेदकांना एका सोनेरी आíथक क्षितिजाची दिशा दाखवली आहे यात शंका नाही!  
‘बिट ऑफ’ या सदरातील ‘गणितोबाशी मत्री’ लेखात हे संकेतस्थळ जाणून घेण्यासाठी आणि आपल्या प्रतिक्रिया कळविण्यासाठी केलेल्या संपर्काबद्दल धन्यवाद.
प्रा. कीर्ती आगाशे
novaviedu@gmail.com mailto:novaviedu@gmail.com