महागाई, बेरोजगारी या दोन प्रमुख मुद्द्यावर संसदेत सरकार बोलत नाही. प्रमुख विषय बाजूला करून केवळ लोकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रसेच्या ‘जनजागर यात्रे’ची माहिती देण्यासाठी सोमवारी त्या ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे आरोप केले.

हेही वाचा- ठाणे : अचानक लागलेल्या आगीत टीएमटी बस जळून खाक

Three bookies arrested for betting on RCB vs Sunrisers Hyderabad IPL match
आरसीबी आणि सनरायझर्स हैदरबाद आयपीएल सामन्यात सट्टेबाजी, तीन बुकींना अटक
Rajan vichare, nomination,
राजन विचारे करणार २९ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी
Voting machines, Thane, Jitendra Awhad,
ठाण्यात भंगार अवस्थेत सापडली मतदान यंत्रे, मतदान ओळखपत्र सापडल्याने खळबळ, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!

देशासमोर बेरोजगारी, महागाई हे गंभीर प्रश्न उभे आहेत. पण त्यावर बोलणे टाळून इतर मुद्दे भाजपकडून पुढे केले जात आहे. या दोन मुद्द्यावर एकही भाजपाचा नेता संसदेत बोलण्याची हिंमत दाखवत नाही. मूळ विषयांचा जनतेला विसर व्हावा. याकरिता भाजपाकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही फौजिया खान यांनी केला. राजकारणात महिलांनी राहावे की नाही, इतकी राजकारणाची पातळी घसरली आहे, असेही फौजिया म्हणाल्या.

हेही वाचा- बदलत्या ठाण्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

यापत्रकार परिषदेस राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाणही उपस्थित होत्या. चव्हाण म्हणाल्या की, गेली सात वर्षे देशात केवळ घोषणांचा पाऊस झाला. केंद्र सरकारने दर वर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी मिळेल असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. इंधनाचे दरही वाढले आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहे. यासर्वांकडे दुर्लक्ष करून रोज काही विवाद निर्माण करायचा, नागरिकांचे लक्ष विचलित करण्याचे काम देशातील सुरु आहे.असा आरोप चव्हाण यांनी केला. जे विरोधात बोलतात त्यांना अटक करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून दाखवाच आम्ही पोलीस ठाण्याला घेराव घालू जाब विचारू.असा इशारा ही विद्या चव्हाण यांनी दिला.