भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी १९९० मध्ये देशभऱ रथयात्रा काढली तेव्हा त्याचं सारथ्य डोंबिवलीत वास्तव्यास असणारे भाजपाचे कार्यकर्ते सलीम मखानी करत होते. याच सलीम मखानी यांच्यावर सध्या शास्त्रीनगर रुग्णालयातील व्हरांडय़ात खुर्चीत बसून उपचार घेण्याची वेळ आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे इतकी वाईट वेळ आली असतानाही त्यांना भाजपाकडून मदतीचा हात मिळाला नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मदतीसाठी धाव घेतली. जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दोन महागडी इंजेक्शन सलीम मखानी यांना उपलब्ध करून दिली. यामुळे त्यांची प्रकृती आता सामान्य आहे

देशात गाजलेल्या रामजन्मभूमी आंदोलनात अग्रेसर राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवेळी सलीम मखानी वाहनाचे चालक होते. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. मागील तीन दिवसांपासून अडवाणींचे हे जुने चालक आजारी आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील खासगी, पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी धावाधाव केली. परंतु कोठेही खाट मिळत नसल्यामुळे भाजपच्या या जुन्याजाणत्या कारसेवकाला अखेर महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणण्यात आले. तिथेही खाट उपलब्ध नसल्याने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील व्हराडय़ांत सकाळपासून एका खुर्चीत बसून ऑक्सिजन पुरवठय़ावर ठेवण्यात आले होते.

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
jitendra awhad eknath shinde Insult news
“ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान, माझ्यासारख्या विरोधकालाही वाईट वाटलं”, जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला!
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य

शास्त्रीनगर रुग्णालयात कृत्रिम श्वसनयंत्रणेची दोन यंत्रे आहेत, तीही उपलब्ध नसल्याचे नातेवाईकांना सांगण्यात आले. मखानी हे दाऊद बोहरा समाजातील आहेत. या समाजाचे भायखळा येथे मदिना सर्वोपचारी रुग्णालय आहे. अखेर त्यांच्या मुखियाशी चर्चा करण्यात आली. त्यांनी मदतीची तयारी दाखविली. शनिवारी रात्री उशिरा भायखळा येथून कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका येऊन सलीमभाईंना उपचारासाठी घेऊन गेली. शास्त्रीनगर रुग्णालयाने सलीमभाईंना संशयित करोना रुग्ण म्हणून जाहीर केले. त्यांच्या फुप्फुसांना जंतुसंसर्ग झाला आहे. प्रकृती गंभीर होत असल्याने अखेर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी सलीमभाईंच्या नातेवाईकांनी संपर्क केला. जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दोन महागडी इंजेक्शन सलीमभाईंना उपलब्ध करून दिली. त्यांची प्रकृती आता सामान्य आहे.

एकही भाजपा लोकप्रतिनीधी मदतीसाठी पुढे आला नाही
पालिकेतील देखभाल-दुरुस्तीची अनेक कामे वर्षभर सलीमभाई करीत असतात. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. पण सलीमभाई आजारी पडल्यानंतर त्यांना रुग्णालयाची गरज वाटली, तेव्हा त्यांना साहाय्य करण्यासाठी भाजपचा एकही लोकप्रतिनिधी पुढे आला नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. भाजपचे दोन आमदार, ४३ नगरसेवक पालिकेत आहेत. यामधील एकही सलीमभाईंच्या मदतीला धावून आला नाही, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगून तीव्र नाराजी व्यक्त केली.