ठाणे येथील रेल्वे स्थानकात रविवारी फलाट आणि रेल्वेच्या फटीतून रुळावर पडलेल्या जखमी तरुणीचा पोलीस हवालदाराने दाखवलेल्या प्रसंगावधनाने जीव वाचल्याची घटना घडली.
ठाणे रेल्वे स्थानकात थांबा नसलेल्या हैदराबाद एक्स्प्रेसमधून वेग कमी झाल्यावर उतरण्याच्या प्रयत्नात विक्रोळी येथील टागोरनगर परिसरात राहणारी पूनम सदाशिव शेवाळे (२१) ही मुलगी फलाट आणि रेल्वेच्या फटीतून रुळावर पडली. तिच्या मदतीला प्रवासी धावून येत नव्हते. तेव्हा कामावर नसलेले मात्र वैयक्तिक कामाकरिता स्थानकात आलेले ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार रघुनाथ बाजीराव कवळे पूनमच्या मदतीला धावून आले. रुळावरून तिला उचलून स्थानकातील हमालांच्या मदतीने कवळे यांनी तिला तात्काळ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमी झालेल्या पूनमचे पोलीस हवालदार कवळे यांच्या कर्तव्यदक्षतेने तात्काळ उपचार होऊन प्राण वाचले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Off duty cop saves woman
First published on: 23-03-2015 at 02:59 IST