ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास भागात रस्ता ओलांडत असताना सोमवारी रात्री दुचाकीच्या धडकेत सत्यम बर्मन (४८) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – मेट्रो १ आता लवकरच एमएमआरडीएच्या मालकीची, एमएमओपीएल विरोधातील दिवाळखोरीची याचिका निकाली

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Mumbai Police, Sub Inspector, police Dies in Accident, Pune Mumbai Expressway, panvel, panvel news, accident news, accident on Pune Mumbai Expressway, Pune Mumbai Expressway accident,
मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू

हेही वाचा – म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण

भिवंडी येथील टेमघर भागात सत्यम बर्मन वास्तव्यास होते. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ते पिंपळास येथील भूमी वर्ल्ड परिसरातून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी दुचाकीची त्यांना जोरदार धडक बसली. या घटनेत सत्यम यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे सत्यम यांच्या कुटुंबियांनी कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.