scorecardresearch

ठाणे : भिवंडीत शाळकरी मुलाकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

शालेय शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एका खासगी शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे

ठाणे : भिवंडीत शाळकरी मुलाकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा
प्रतिनिधिक छायाचित्र (फोटो: द इंडियन एक्सप्रेस)

भिवंडी येथे एका आंदोलनादरम्यान, १२ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी मेरी पाठशाला या संस्थेच्या सदस्यांविरोधात आणि आंदोलनात सहभागी झालेल्या काही जणांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

हेही वाचा >>> ठाण्यात भाजप-शिंदे गटातील संघर्ष अधिक तीव्र; भाजपचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला

शालेय शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एका खासगी शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून मेरी पाठशाला या संस्थेचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक शाळेबाहेर आंदोलन करत आहे. त्याचवेळी एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा दिली. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी आयोजकांविरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 18:01 IST

संबंधित बातम्या