डोंबिवली- काटई ते बदलापूर पाईप लाईन रस्त्यावर गेल्या वर्षीपासून दुचाकी, मोटारीतून येणारे भुरटे चोर प्रवासी, महिला, रोजंदारी कामगार यांना लुटण्याचे प्रकार करत आहेत. या वाढत्या घटनांमुळे रस्त्यांवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रस्त्यावर मंगळवारी दुपारी नवी मुंबईतील एक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले.

गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये एक रोजंदारी कामगार, एका मोटार कार चालकाला अडवून लुटण्यात आले होते. दर आठवड्याला या रस्त्यावर संध्याकाळी ते रात्री प्रवासी, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार घडत असल्याने या रस्त्यावरील पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

हेही वाचा >>> “…अन्यथा शिंदे गट आणि पोलीस जबाबदार असतील”, ठाण्यात शाखांवरून ठाकरे-शिंदे गटामध्ये वाद उफाळला

मंगळवारी दुपारी बदलापूर पाईप लाईन रस्त्यावर मार्या हाॅटेल समोर एका फळ विक्रेत्याकडून फळे खरेदीसाठी नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या अश्विनी गवळी आपल्या मुलीसह उभ्या होत्या. त्यावेळी रस्त्यावरुन दुचाकी स्वार वेगाने अश्विनी यांच्या दिशेने आले. त्यांनी अश्विनी यांच्या गळ्यावर जोराने थाप मारुन त्यांच्या गळ्यातील एक लाख ६० हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र हिसकले. हिसकताना ते पुन्हा मानेला अडकले. चोरट्याने ते जोराने हिसकल्याने अश्विनी यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. ऐवज ताब्यात आल्यानंतर दुचाकीवरील दोघे जण पसार झाले. अश्विनी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे.