पावणे दोन लाखांची चोरी

येथील राहनाळ गावातील संभव कॉम्प्लेक्समधील केमिकल पावडरच्या गोदामात चोरी झाल्याची घटना घडली

येथील राहनाळ गावातील संभव कॉम्प्लेक्समधील केमिकल पावडरच्या गोदामात चोरी झाल्याची घटना घडली असून चोरटय़ांनी गोदामातून एक लाख ८७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. फेब्रुवारी महिन्यात हे गोदाम बंद होते. या संधीचा फायदा घेऊन चोरटय़ांनी गोदामाचे ग्रील व शटरला लावलेले कुलूप तोडून ही चोरी केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पावणे चार लाखांचा ऐवज लुटला
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गाजवळील श्री जी हाऊसमधील एका दुकानाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी सुमारे तीन लाख ७३ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. टेबल, खुच्र्या, संगणक, प्रिंटर, कटर मशिन, ड्रिल मशिन आदी साहित्य चोरीस गेले आहे. या चोरीप्रकरणी चंद्रकांत इगवले व दिगंबर सुखी यांच्यासह सात ते आठ जणांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार राबोडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Robbery in thane