शिवाई बालक मंदिर ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सीमा ठोसर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवाई वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. अंतिम फेरीसाठी दहा स्पर्धक निवडले जाणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाप्रमाणे ही स्पर्धा होणार आहे.
जून १९९८ ते मे २००० या कालावधीत जन्मलेल्या मुले, मुलींना गट क्रमांक १ मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. जून १९९५ ते मे १९९८ या कालावधीतील मुले, मुलींना गट क्रमांक २ मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. स्पर्धा प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर आहे. अंतिम फेरीतील १० स्पर्धकांची नावे २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत एमआयडीसीतील शिवाई बालक मंदिर शाळेत जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त अॅड. शशिकांत ठोसर यांनी दिली. प्रवेश अर्ज २० नोव्हेंबपर्यंत आदित्य सभागृह, आगरकर रस्ता, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ५ ते रात्रो ८ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. संपर्क : यशवंत भुस्कुटे- ९८१९१४७६४७.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2015 रोजी प्रकाशित
शिवाई वक्तृत्व स्पर्धेचे डोंबिवलीत आयोजन
दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.
Written by मंदार गुरव
Updated:
First published on: 18-11-2015 at 00:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivai oratory competition in dombivali