ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ९०० खाटांचे सुपरस्पेशलिटी रुग्णालय उभारणीत येणार असून या कामाच्या निविदा प्रक्रियेस होत असलेल्या विलंबाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत येत्या पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया उरकून प्रत्यक्षात काम सुरूवात करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटाचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असून या रुग्णालयाची रुग्णालयाची क्षमता तिप्पट होणार आहे. तसेच, न्यूरॉलॉजी, आँकॉलॉजी व आँको सर्जरी सेक्शन, कार्डिओलॉजी व कार्डिओ व्हॅस्क्युलर सेक्शन आणि नेफ्रॉलॉजी व डायलिसिस सेक्शन यांसारख्या अत्याधुनिक उपचार सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार असल्यामुळे कर्करोग, हृदरोग, मेंदूशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित विकार या आजारांवरही उपचार करता येणे शक्य होणार या प्रस्तावानुसार रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र आणि वसतीगृह इमारतीच्या बांधकामासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी मंजुर केला आहे.

farmers, loan waiver, Nagpur High Court,
शेतकरी सन्मान कर्जमुक्तीपासून वंचित शेतकऱ्यांबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, नागपूर उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Medical, AIIMS, High Court,
‘मेडिकल’साठी दिलेले १.६० कोटी ‘एम्स’साठी वापरले, उच्च न्यायालय म्हणाले, आता परत द्या…
Waiting for Upazila Hospital of Uran possibility of funds getting stuck in code of conduct of elections
उरणच्या उपजिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच, निवडणुकीच्या आचारसंहितेत निधी अडकण्याची शक्यता
officials and employees have breakfast by stopping polling mess at Yavatmals Hivari Polling Station
अरेच्चा! आधी पोटोबा, मग… मतदान थांबवून अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंगत; यवतमाळच्या हिवरी मतदान केंद्रावर गोंधळ

यामुळे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची निविदा अद्याप काढलेली नाही. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाणे जिल्ह्यधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत नाराजी व्यक्त केली. निविदा काढण्यास इतका विलंब का होत आहे असा जाबही त्यांनी विचारला. विद्युत विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रियेस विलंब होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर येत्या पंधरा दिवसात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करत निविदा प्रक्रिया उरकून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्याचे आदेश त्यांनी दिले.