ठाणे : तुम्ही बसगाड्यांमधून प्रवास करत असाल तर सावधान काही महिला लहान मुलाला हातात घेऊन चोऱ्या करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे साडेपाच तोळे सोने या महिला चोरट्यांनी चोरी केले आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सरकारने महिलांना आणि वृद्धांना राज्य परिवहन सेवेच्या बसगाड्यांमधून (एसटी) प्रवास करताना सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे आणि वृद्धांचे प्रमाण वाढले आहे. पालघर येथील विक्रमगडमध्ये ६९ वर्षांची महिला राहते. काही दिवसांपूर्वी त्या ठाण्यात त्यांच्या नातेवाईकांकडे येण्यासाठी एसटी बसगाडीतून प्रवास करत होत्या. त्यांनी त्यांच्या पर्समध्ये साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. एसटी भिवंडी येथे आली असता त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बसगाडीमधील वाहकाने वृद्धेला ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुसऱ्या एसटीमध्ये बसवून दिले. बसगाडी काही अंतरावर गेली असता, तीन महिला त्या बसगाडीमध्ये चढल्या. त्यांच्यासोबत लहान मूल होते. एक महिला वृद्धेच्या शेजारी बसली. दुसरी महिला बसगाडीच्या जिन्यांवर बसली. तर तिसरी महिला वृद्धेच्या मागे उभी राहिली. उभ्या असलेल्या महिलेने वृद्धेकडे पाण्याने भरलेली बाटली दिली. त्या बाटलीतील पाणी दुसऱ्या बाटलीत ओतण्यास सांगितले. थोड्यावेळेत जिन्यांवर बसलेल्या महिलेने वृद्धेला एक पिशवी दिली. त्या पिशवीमधून बिस्किट काढून देण्यास सांगितले.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

हेही वाचा – जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कोण याचा तिढा सुटेना

हेही वाचा – विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या दबावापुढे न झुकण्याची भाजपची भूमिका

याप्रकारामुळे वृद्ध महिला संतापली. तिने बिस्किटांची पिशवी फेकून देत तुमची कामे करण्यासाठी येथे आली नसल्याचे त्यांना खडसावले. ठाण्यातील माजीवडा येथे बसगाडी आल्यानंतर वृद्धा बसगाडीमधून खाली उतरली आणि तिच्या नातेवाईकांच्या घरी निघून गेली. घरी आल्यावर त्यांनी पर्स उघडली असता, त्यामध्ये दागिने आढळून आले नाही. त्या महिलांनीच हा प्रकार केला असल्याचा संशय असल्याने वृद्धेने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.