ठाण्यात गुरुवारी सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्या. मुंब्रा येथील अमृतनगर भागात राहणाऱ्या छाया शैलेंद्र जाधव (३०) या गुरुवारी मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना मुंब्रा-पनवेल सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने जाधव यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला.
अन्य एका घटनेत कल्याण येथील पत्रीपूल परिसरात राहणाऱ्या संजीवनी भानुदास देखणे (४३) या रिक्षातून उतरत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ांनी देखणे यांची एक लाख ४० हजार रुपयांची सोनसाखळी खेचली. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोटारसायकल चोरी
ठाणे : माजिवडा भागातील साकेत कॉम्प्लेक्स इमारतीत राहणाऱ्या चिराग जयराज ठाणेकर (२७) यांची एक लाख दहा हजारांच्या मोटारसायकलची चोरी झाली. उल्हासनगर येथे राहणाऱ्या श्रीचंद खानचंद धर्मानी (६७) यांच्या मोटारसायकलची चोरटय़ाने चोरली. ठाण्यातील रामचंद्रनगरमधील राहणाऱ्या अशोक गणपतराव सांगले (४२) यांची वागळे इस्टेट परिसरातील अ‍ॅग्रीकल्चर येथून बुधवारी मोटारसायकल चोरून नेली.
तिजोरीसह दोन लाखांची लूट
ठाणे: येथील चरई परिसरातील धोबीआळी भागात राहणाऱ्या कर सल्लागार निलेश सुंदरजी गोसर (४१) यांच्या चरई भागातील कार्यालयात गुरुवारी चोरी झाली. बंद कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची जाळी तोडून चोरटय़ाने आत प्रवेश केला आणि दोन लाख ५० हजार रुपयांसोबत तिजोरीदेखील चोरून नेली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मशिदीतील साहित्याची चोरी
ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातील तयबा मशिदीत कामासाठी आणलेल्या वायर आणि इतर साहित्याची चोरी केल्याची घटना बुधवारी घडली. मशिदीत दुरुस्तीचे काम सुरू होते. चोरटय़ाने मागील उघडय़ा खिडकीतून आत प्रवेश करून आतील वायर, तीन पंखे, ग्राइंडर यंत्र असा ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरला.