ठाणे शहरातील सहा तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाच्या सुकाणू समितीने गुरुवारी मान्यता दिली असून या प्रस्तावानुसार तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. शहरातील तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध व्हावा, म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी महापालिकेला एक प्रस्ताव सादर केला. त्यानुसार, महापालिकेने शहरातील सहा तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरण करणासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाला पाठविला. यामध्ये ठाणे शहरातील मासुंदा व जेल तलाव, घोडबंदरमधील तुर्भेपाडा व नार तलाव, हरिओमनगरमधील तलाव आणि कावेसरमधील तलाव, अशा सहा तलावांचा समावेश होता. राज्य शासनाच्या तलाव संवर्धन सुकाणू समितीची गुरुवारी बैठक झाली. यामध्ये या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2015 रोजी प्रकाशित
ठाण्यात तलावांच्या सुशोभीकरणाचा मार्ग मोकळा
ठाणे शहरातील सहा तलावांचे संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याच्या प्रस्तावास राज्य शासनाच्या सुकाणू समितीने गुरुवारी मान्यता दिली असून या प्रस्तावानुसार तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.
First published on: 06-02-2015 at 02:16 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane lacks