महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठरवून दिलेले उत्पन्न वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे पालिका प्रशासनाने मालमत्ता कर आणि पाणी देयकांच्या वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून थकबाकीदारांवर पालिकेने कारवाई सुरु केली असून त्यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. घोडबंदर भागातील आर मॉलचा पाणी पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे.

महापालिका अर्थसंकल्पात मालमत्ता कर आणि पाणी देयक वसुलीसाठी ठरवून दिलेले उदिष्ट साध्य करण्यासाठी थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांची नळजोडणी खंडित करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना यापूर्वीच दिले आहेत. या आदेशानंतर पालिका प्रशासनाने शहरातील मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात विशेष मोहिम हाती घेऊन कारवाई सुरु केली आहे.

Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

आर मॉलचा पाणीपुरवठा खंडित!

अशाच प्रकारची कारवाई माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई सुरु केली आहे. यामध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील सॅम्युल नाडर यांची फरसान फॅक्टरी, जितेंद्र पाटील यांचे पाच गाळे, महावीर कल्पवृक्ष (क्लब हाऊस ) या मालमत्तांची एकूण २६ लाख रुपयांची थकबाकी असून या मालमत्ता कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच घोडबंदर रोड येथील आर मॉलचा १ कोटी ३८ लाख रुपये इतका मालमत्ता कर थकीत असून या मॉलचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. मॉलला जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे.

ठाणे : पाण्याचे फुगे फेकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिशव्यांवर कारवाई

घोडबंदर भागातील ब्लॉक क्र. १०५ मधील चार मालमत्तांचा एकूण १३ लाख ६३ हजार रुपये इतका कर थकीत होता. या मालमत्तांचा १४ मार्च रोजी जाहीर लिलाव ठेवण्यात आला होता. परंतु लिलाव प्रक्रियेपूर्वीच संबंधित चारही थकबाकीधारकांनी कराची संपूर्ण रक्कम महापालिकेस जमा केली आहे. पालिकेच्या कारवाईमुळे थकबाकीदरांचे धाबे दणाणले आहेत.