पालिका प्रवेशद्वारावर वाघाचे चित्र

Dombivli, sweeper argument,
डोंबिवलीत पालिका साहाय्यक आयुक्ताबरोबर सफाई कामगाराची अरेरावी
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका

ठाणे : ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या आठवडय़ात संपुष्टात येत असताना गेल्या काही दिवसांपासून मुख्यालयात नव्यानेच उभारण्यात आलेल्या शिवशिल्पाशेजारी असलेल्या भिंतीवर फडकविण्यात आलेले दोन भले मोठे भगवे झेंडे अनेकांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहेत. मुख्यालयांच्या प्रवेशद्वारावर वाघाचे चित्रही रेखाटण्यात आले असून भिंतीवर भगवा आणि प्रवेशद्वारावरील वाघामुळे शहरातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. 

ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीवर यापूर्वीच शिवशिल्पाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. ही प्रतिकृती जुनी असल्यामुळे ती धोकादायक बनली होती. यामुळे ही प्रतिकृती काढून त्या जागी नवीन शिवशिल्पाची प्रतिकृती उभारणीची मागणी होत होती. ही मागणी मान्य करत तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामाचा प्रस्ताव तयार केला होता. तसेच त्यासाठी निधीचीही तरतूद केली होती. सत्ताधारी शिवसेनाही या नव्या शिल्पांच्या उभारणीसाठी आग्रही होती. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर जुनी प्रतिकृती काढून नवीन शिवशिल्प उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी हे काम पूर्ण होताच त्याचे लोकार्पण करण्यात आले.

ठाणे महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या ५ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. हा कार्यकाळ संपण्यापूर्वी शहरात वेगवेगळय़ा विकासकामांच्या शुभारंभाचा धडाका लावण्यात आला आहे. ओबीसी   आरक्षणाचा तिढा संपुष्टात आला तर एप्रिल महिन्याच्या अखेरीस महापालिका निवडणुकाही जाहीर होतील अशीच चर्चा आहे. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळय़ा महापालिकांमध्ये राजकीय पातळय़ांवर यासाठी तयारीही सुरू आहे. असे असताना शिवशिल्पांच्या निमित्ताने मुख्यालयांच्या भिंतीवर फडकलेला भगवा लक्षवेधी ठरला आहे.

 शिवसेनेची रणनीती ?

ठाणे महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना पुन्हा एकदा ठाण्यावर भगवा फडकविण्याच्या घोषणाही शिवसेना नेत्यांकडून सुरू झाल्या आहेत. राज्यात मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेसला अंगावर घेत ठाण्यातील राजकीय वातावरण तापविण्याची एकही संधी शिवसेना नेते सोडत नसल्याचे चित्र आहे. असे असताना या शिवशिल्पाशेजारीच असलेल्या भिंतीवर आता दोन भले मोठे भगवे झेंडे लावण्यात आल्याने ठाण्यातील आगामी राजकीय वाटाचालीचे संकेतच शिवसेनेने दिल्याची चर्चा आहे. यापूर्वीच्या शिवशिल्पाशेजारी भगवे झेंडे लावण्यात आलेले नव्हते. याशिवाय मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील भिंतींवर वारली पेंटिंग तसेच इतर चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रवेशद्वारालगच्या भिंतीवर वाघाचे मोठे चित्र रेखाटण्यात आले आहे. मुख्य इमारतीवर भगवा आणि प्रवेशद्वारावरील हा वाघ निवडणुकीच्या वातावरणात लक्षवेधी ठरला आहे.

ठाणे महापालिकेवर नव्याने उभारण्यात आलेल्या शिवशिल्प प्रतिकृतीचा एक भाग म्हणून तिथे भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. भगवा झेंडा हा हिंदूवी स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक आहे. हा झेंडा महाराष्ट्र आणि मराठी माणसाचा अभिमान आहे. त्यामुळे शिवशिल्प प्रतिकृतीशेजारी लावलेल्या भगव्या झेंडय़ाचा कोणी पक्षीय अर्थ काढत असेल तर तो माझा नाईलाज असून त्यांनी त्याचा काय अर्थ काढावा, हा त्यांचा प्रश्न आहे.  -नरेश म्हस्के, महापौर